वाहनांच्या शोरूममुळे रस्त्यात अडथळे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Aug-2018
Total Views |





 

उल्हासनगर : सार्वजनिक रस्ते आणि फुटपाथ काबीज करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणार्या गॅरेज आणि वाहनांच्या शोरूमवर उल्हासनगर वाहतूक पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. सध्या शेकडो दुकानदारांवर दंडात्मक कारवाई केली असून यापुढे वाहने जप्त करण्याची कारवाई करण्यात येईल, अशी माहिती वरिष्ठ वाहतूक पोलीस निरीक्षक कल्याण घेटे यांनी दिली आहे. कल्याण-कर्जत या राज्यमार्गाचे रस्ता रुंदीकरण करण्यात आले असले तरी अनेक कारणांमुळे अजूनही या राज्यमार्गाच्या उल्हासनगर शहराच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते. याला अनेक कारणे असून त्यातील प्रमुख कारण म्हणजे रस्त्यालगत असलेल्या गॅरेज, जुनी वाहने विक्री करणारे शोरूम, वाहनांचे डेकोरेशन करणारे शोरूम यांनी रस्ते आणि फुटपाथ काबीज केली आहेत. यामुळे वारंवार वाहतूककोंडी निर्माण होते आणि अपघातदेखील होतात.

 

पोलीस पथकाने कल्याण-कर्जत राज्यमार्गावरील उल्हासनगर शहराच्या हद्दीतील शांतीनगर ते फालवर लाईन परिसरातील वाहतुकीस अडथळा निर्माण करणार्‍या सुमारे १०० ते १२५ १२५ गॅरेज, शोरूम आणि दुकानदारांवर गेल्या ३ दिवसांपासून वाहतूक पोलीस अधिनियम आणि मुंबई पोलीस कायद्यान्वये दंडात्मक कारवाई केली. वाहतुकीस अडथळा निर्माण करू नका आणि कायद्याचे पालन करा, अशा वारंवार सूचना दुकानदारांना देण्यात आल्या आहेत. मात्र यापुढे दुकानदारांनी सूचनेचे पालन केले नाही तर आम्ही कायद्यानुसार वाहने जप्त करण्याची कारवाई सुरू करणार असल्याचे पोलीस पथकाने सांगितले. केवळ कल्याण-कर्जतच नव्हे तर उल्हासनगर शहरातील अनेक रस्ते आणि आणि फुटपाथ दुकानदारांनी काबीज केले आहेत. अनेक ठिकाणी अवजड भंगार वाहने कित्येक वर्षांपासून पडलेली आहेत. त्यांच्यावरदेखील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण घेटे यांनी दिली असून महानगरपालिकेनेदेखील या मोहिमेला सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.
@@AUTHORINFO_V1@@