केरळमध्ये अद्याप पूर स्थिती कायम, ४५ जणांचा मृत्यु

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Aug-2018
Total Views |



 

केरळ: केरळमध्ये सततच्या पावसामुळे परिस्थिती अधिक बिकट झाली आहे. केरळमध्ये सध्या बचावकार्य सुरू आहे. केरळ प्रशासन आपले परिपूर्ण प्रयत्न करत आहे. पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. यापूरामध्ये मृतांचा आकडा आतापर्यंत ४५ वर पोहोचली आहे. केरळ राज्यात कन्नूर, पलक्कड , इदुक्की, कोझिकोड, मल्लपुरम या ठिकाणी अतिवृष्टीमुळे धोक्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. या पावसाचा कोची विमानतळाला चांगलाच तडाखा बसला आहे. त्यामुळे कोची विमानतळ येत्या शनिवार पर्यंत प्रवाशांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
 

केरळमध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाचा सपाटा चालू आहे. मुसळधार पावसामुळे पेरियार नदीवर असलेल्या धरणाच्या पातळीत वाढ झाली आहे. धरणाचे पाणी विमानतळाच्या धावपट्टीवर आले आहे. त्यामुळे शनिवार दुपारपासून विमानसेवा बंद ठेवण्याचा निर्णय केरळ प्रशासनाने घेतला आहे. धावपट्टीवरील पाण्याचा निचरा होईपर्यंत केरळमधील विमानसेवा बंद ठेवण्यात येईल.

@@AUTHORINFO_V1@@