मुलांनी दिले सैनिकांना शुभ संदेश

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Aug-2018
Total Views |


 


मुंबई : ज्ञानदा प्रबोधन आणि राष्ट्राभिमानी समिती तर्फे घेण्यात आलेल्या सैनिकांसाठी शुभ संदेशाच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या सिटी लॉस ऑफ एंजेलीस शाळेतील मुलांनी कुलाबा येथील सैनिकांना भेट दिली. सैनिकांनी आमचे भव्य स्वागत केले. त्यावेळी कर्नल सरबजीत सिंग हे उपस्थित होते. मुलांनी सर्व सैनिकांसमोर वेगवेगळे मनोरंजनाचे कार्यक्रम करून त्यांची दाद मिळवली. सैनिक श्री परमेश्वर यांनी तर तुम्ही असेच वारंवार आम्हच्याकडे आलात तर आम्हाला आनंदच होईल असे सांगितले. कर्नल सिंग यांनी उपस्थित विद्यार्थ्यांचे आभार मानले व आमच्या शुभ संदेशाच्या कार्यक्रमाचे व आमच्या संस्थेच्या वेगवेगळ्या उपक्रमांचे ही अभिनंदन केले.

 

त्यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ चंपानेरकर, शिक्षिका मीनल मालवणकर, कल्पिता गिरकर तसेच संस्थेचे अध्यक्ष प्रशांत पळ, सेक्रेटरी मनोज मिसाळ, राज दुदवडकर, महिला प्रमुख वनिता चेटियार, मार्गदर्शक विलास फडके, संजय नगरकर, कार्यकर्ते अजय पोतदार, सुबोध मालवणकर, महेंद्र वालम, किरण पळ, ऍड शेजल पवार, रोहन गुरव, एड,सिद्धेश तीवरेकर,अस्मिता तोस्कर हे उपस्थित होते. विद्यार्थ्यांवर संस्कार घडवणे, त्यांना सैनिकांबद्दल आत्मीयता निर्माण व्हावी ह्याच ध्येयाने संस्थेचे कार्य गेल्या अनेक वर्षांपासून निरंतर सुरू आहे व त्या कार्यात संस्था कोणाकडूनही विशेष करून राजकीय व्यक्तींकडून मदत न घेता संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते स्वतः हा खर्च उचलतात

 
 
@@AUTHORINFO_V1@@