नाशिकमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Aug-2018
Total Views |



नाशिक : प्रभाग क्र. मध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त बुधवार दि. १५ ऑगस्ट २०१८ रोजी सकाळी 8.३० वाजता भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहण झाल्यानंतर स्वातंत्र्यसैनिक, निवृत्त सैनिक, शेतकरी बांधव यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर मोफत नेत्र तपासणी (डोळे) शिबीर नाशिकमधील प्रसिद्ध बिर्ला आय हॉस्पिटल प्रियांका धनंजय माने मा. सभापती पंचवटी प्रभाग नगरसेविका प्रभाग क्र. यांच्यातर्फे आयोजन करण्यात आले होते. त् परिसरातील १८० नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली. याप्रसंगी प्रभाग क्र. मधील स्वातंत्र्यसैनिक, निवृत्त सैनिक, शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामध्ये स्वातंत्र्य दिन साजरा झाला. विद्यापीठाचे प्रति कुलगुरू डॉ. मोहन खामगावकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण विद्यापीठाचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

देशासाठी लढणाऱ्या हुतात्म्यांचे स्मरण करून देश विकासासाठी देशरक्षणासाठी प्रत्येकाने पुढे येणे गरजेचे असून लोकशाही मूल्यांची जपणूक करून समानता जोपासावी,” असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, विभागीय केंद्र नाशिकचे काऱ्या ध्यक्ष विश्वास ठाकूर यांनी केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक, नवमहाराष्ट्र युवा अभियान, विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अॅलण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक रेडिओ विश्वास ९० . कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ७२ व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येलायुवा स्वतंत्रता ज्योत रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

@@AUTHORINFO_V1@@