स्वातंत्र्यदिनी देशावर आधारित शंकर महादेवनचे गाणे प्रसिद्ध

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Aug-2018
Total Views |
 
 
 
 
मुंबई : प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांनी आजच्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत ट्वीटरवर एक देशभक्ती जागवणारे गाणे शेअर केले आहे. आपल्या स्वप्नातील या विषयावर तयार करण्यात आलेले हे गाणे सध्या आजच्या दिवसाचे औचित्य साधत शंकर महादेवन यांनी शेअर केले आहे. ७२ व्या स्वातंत्र्य दिनाचे स्वागत म्हणून हे गाणे तयार करण्यात आले आहे. 
 
 
 
 
‘ब्रिथलेस’ हे शंकर महादेवन यांचे गाजलेले गाणे या गाण्याच्या चालीवर देशाप्रती मान जागविणारे गाणे शंकर महादेवन यांनी गायले असून ते आज आपल्यापर्यंत पोहोचविले आहे. आजचा भारत तंत्रज्ञान, शिक्षण, आरोग्य, रेल्वे, मेट्रो, सामाजिक, आर्थिकदृष्ट्या कशी प्रगती करत आहे तसेच या प्रगतीमध्ये तरुणांचा काय हातभार आहे असे चित्रण करणारे हे गाणे असून काही तासांपूर्वी हे गाणे सोशल मिडियावर टाकण्यात आले असून ते जोरदार शेअर देखील करण्यात येत आहे. 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@