ऐकावं ते नवलच; आता रोबोच करणार शस्त्रक्रिया!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Aug-2018
Total Views |


 


मुंबई : २१ वे शतक हे तंत्रज्ञानाचे मानले जाते. याचा आपण अनेकवेळेस अनुभव देखील घेतला आहे. असाच तंत्रज्ञानाचा एक चमत्कार आपल्या मुंबई महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये घडणार असून रोबोच करणार शस्त्रक्रिया करणार आहे. ऐकून नक्कीच आश्चर्य वाटले असेल मात्र हे खरं आहे. मुंबई महापालिकेच्या केईएम रुग्णालयात रोबो शस्त्रक्रिया करणार असून या रोबोटमुळे कॅन्सर, रिकंन्स्ट्रक्शन आणि अशा अनेक अवघड शस्त्रक्रिया करणे अगदी सोपे होणार आहे.

 

रोबोटने केलेल्या शस्त्रक्रियेमुळे वेळ वाचणार असून रक्ताचा अपव्ययदेखील थांबणार आहे. दरम्यान, या रोबोटचा सर्व कंट्रोल हा डॉक्टरांच्याच हातात असून या रोबोटद्वारे शस्त्रक्रिया कशी करावी याचे डॉक्टर्स प्रशिक्षण घेत आहेत. शस्त्रक्रियेसाठी तयार करण्यात आलेल्या एका रोबोटची किंमत जवळपास २० करोड रुपये एवढी असणार आहे.

 

अशी केली जाते शस्त्रक्रिया

 

ज्या भागाची शस्त्रक्रिया करायची त्यावर लहान चीर पाडली जाते. यामुळे त्वचा जास्त प्रमाणात कापावी लागत नाही. सात मिलिमीटरच्या छेदातून यांत्रिक हातांच्या सहाय्याने दुर्बिण रुग्णाच्या पोटात बसविण्यात येते. दुर्बिणीच्या साहाय्याने शरीराचा भाग डॉक्टरांना स्क्रीनवर दिसतो. त्या चित्रफितीच्या आधारे तज्ज्ञ शस्त्रक्रिया करतो. याच लहान छिद्रातून यंत्र शरीराच्या आत सोडले जाते. शरीराअंतर्गत गेलेल्या यंत्राच्या माध्यमातून शल्यचिकित्सा केली जाते. हे करताना डॉक्टरांचे यांत्रिक हातांवर पूर्ण नियंत्रण असते. त्यांनी दिलेल्या निर्देशानुसार यांत्रिक हातांद्वारे अत्यंत सराईतपणे शस्त्रक्रिया केली जाते. कमी जखमा, छोटी उपकरणे हाताळणे यंत्राला शक्य होते. त्यामुळे शस्त्रक्रिया रोबोमार्फत करून घेणे सोपे जाते.

 

पालिकेची मंजुरी मिळाल्यानंतर तंत्रज्ञान सुरु

 

रोबोटिक शस्त्रक्रियेचा कॅन्सर, लिव्हर सर्जरी अश्या मोठ्या शस्त्रक्रियेसाठी उपयोग होतो. त्यामुळे ही मशीन पालिकेच्या प्रत्येक रुग्णालयात असेल तर त्याचा उपयोग मोठ्या प्रमाणात रुग्णांना होईल यात काही शंका नाही. शिवाय, सर्वच रुग्णांना या शस्त्रक्रियेचा वापर होत नाही. त्यामुळे तिचे मेनटंन्स ठेवणे ही सोपे जाईल. या प्रस्तावावर सध्या मुंबई महापालिकेत चर्चा सुरू आहे. या रोबोटिक शस्त्रक्रियेच्या प्रस्तावावर गेल्या वेळेसही चर्चा झाली होती. पण, मशीन्स महाग असल्याकारणाने हा प्रस्ताव मार्गी लागला नाही. काही दिवसात पालिकेच्या सभागृहात प्रस्ताव मंजूर झाल्यावर हे तंत्रज्ञान सुरु होईल.

 

- सुजाता पटवर्धन

केएम हॉस्पिटल सर्जन विभाग प्रमुख
@@AUTHORINFO_V1@@