यूपी, हिमाचल आणि केरळला अतिदक्षतेचा इशारा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Aug-2018
Total Views |



उत्तर आणि दक्षिण भारतामध्ये मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरानंतर भारतीय हवामान खात्याने आज पुन्हा एकदा हिमाचल, उत्तर प्रदेश आणि केरळ या तीन राज्यांना अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. येत्या २४ तासांमध्ये या तिन्ही राज्यांमध्ये मुसळधार पाऊस होणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली असून तिन्ही राज्यांना सतर्क राहण्याची सूचना हवामान खात्याने दिली आहे.


गेल्या तीन दिवसांपासून उत्तर आणि दक्षिण भारतामध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे या तिन्ही राज्यांमध्ये विशेषतः केरळमध्ये मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. या पुरामध्ये आतापर्यंत ४० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला असून अनेक जण अद्याप बेपत्ता आहेत. तसेच राज्यातील एकूण साडे आठ हजार कोटी रुपयांहून अधिक मालमत्तेचे या पावसामुळे नुकसान झाले आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून याठिकाणी मदत कार्य सुरु आहे. दरम्यान राज्यामध्ये अजून पाऊस सुरु असलेल्यामुळे अनेक ठिकाणी असलेली धरणे ओसंडून वाहू लागली आहेत. त्यामुळे धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. परिणामी पुराचा धोका अद्याप कायम आहे. त्यात हवामान खात्याने आज पुन्हा एकदा अतिवृष्टीचा इशारा दिल्यामुळे केरळच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


दरम्यान हीच परिस्थिती हिमाचल आणि उत्तर प्रदेशमध्ये देखील पाहायला मिळत आहे. या दोन्ही राज्यांमध्ये पुराची भीषणता थोडी कमी असली तरी अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी जमा झाले आहे. त्यामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. पायाभूत सुविधा देखील कोलमडून पडल्यामुळे अनेक गावांशी संपर्क तुटला आहे. त्यामुळे हवामान खात्याच्या इशारामुळे नागरिकांना देखील सतर्क राहण्याची सूचना प्रशासनाकडून जारी करण्यात आली आहे.
@@AUTHORINFO_V1@@