'एक देश, एक निवडणूकीला होणारा विरोध हा फक्त राजकीय' : अमित शहा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Aug-2018
Total Views |

एकत्र निवडणुकांच्या मागणीसाठी शाहांचे विधी आयोगाला पत्र




नवी दिल्ली : 'एक देश, एक निवडणूक' या मागणीला विरोधकांचा होणारा विरोध हा फक्त राजकीय असून या प्रक्रियेला देशाचे संघीय स्वरूप अधिक बळकट होईल, असा दावा भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार अमित शाह यांनी केला आहे. 'एक देश, एक निवडणूक' या मागणीसाठी शाह यांनी विधी आयोगाला पत्र लिहिले असून आपल्या पत्रामध्ये त्यांनी हा दावा केला आहे.


देशामध्ये प्रत्येक वर्षी निवडणुका होता. या सर्व निवडणुकांचा खर्च हा सरकारी खजिन्यातून केला जातो. वेगवेगळ्या निवडणुका होत असल्यामुळे सर्व निवडणुकांवर वेगवेगळा खर्च करावा लागतो. ज्याचा सर्व ताण सरकारवर पडतो. तसेच निवडणुकांमुळे देशातील प्रत्येक भागात नेहमी आचारसंहिता लागू केली जाते. यामुळे प्रशासकीय कामकाजामध्ये देखील अडथळा निर्माण होतो. त्यामुळे हे सर्व टाळण्यासाठी म्हणून माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, वर्तमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'एक देश, एक निवडणूक'ची समर्थन केले आहे. म्हणून देशहितासाठी या गोष्टीवर अमलबजावणी झाली पाहिजे, असे शाह यांनी म्हटले आहे.


दरम्यान याला विरोधकांचा होत असलेला विरोध हा फक्त आणि फक्त राजकीय विरोध असल्याचे त्यांनी म्हटले आहे. एकत्र निवडणुका घेतल्यास याचा देशाच्या संघीय स्वरूपाला धोका बसेल असा जो दावा केला जात आहे. तो पूर्णपणे फोल असून उलट यामुळे देशाचे संघीय स्वरूप आणखी बळकट होईल, असे शाह यांनी म्हटले आहे.
@@AUTHORINFO_V1@@