मुख्य रस्त्यांच्या कामांना २० ऑगस्टचा मुहूर्त

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Aug-2018
Total Views |


 

अंबरनाथमधील मुख्य रस्त्यांच्या कामांना २० ऑगस्टपासून सुरुवात होणार
 

अंबरनाथ : अंबरनाथमधील शहरातील मुख्य सी सी रस्त्यांचे कामांना २० ऑगस्टपासून सुरु करण्यात येणार आहेत, आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी या रस्त्यांच्या कामांसाठी ५५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला होता. शहरातील प्रमुख रस्त्यांच्या सिमेंट कॉक्रीटीकरणाला २० ऑगस्ट पासून सुरुवात करण्यात येणार असल्याचे आश्वासन मुंबई प्रदेश विकास प्राधिकरण च्या अधिकाऱ्यांनी आमदार डॉ. किणीकर यांना दिले.  मुंबई प्रदेश विकास प्राधिकरण च्या बाह्य रस्ते विकास योजनेंतर्गत अंबरनाथमधील मुख्य रस्त्यांच्या सिमेंट कॉक्रीटीकरणासाठी सातत्याने पाठपुरावा करून आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी ५५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला होता. मात्र त्या कामांना अद्याप सुरुवात झाल्याने आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या कामना सुरुवात होणार असल्याने गणरायाचे आगमन खड्डे मुक्त रस्त्याने होणार आहे. अंबरनाथ मधील रस्त्यांची कामे रखडल्यामुळे नागरिकांना खड्यांच्या त्रासांना समस्यांना सामोरे जावे लागत होते. याबाबत आमदार डॉ. किणीकर यांनी मुंबई प्रदेश विकास प्राधिकरण अंबरनाथ शहरातील प्रमुख शासकीय विभागातील सर्व अधिकाऱ्यांची नगरपालिका सभागृहात सोमवारी बैठक आयोजित केली होती. या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार मुंबई प्रदेश विकास प्राधिकरण च्या अधिकाऱ्यामार्फत २० ऑगस्टपासून शहरातील प्रमुख रस्त्यांची कामे टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येतील असे सांगण्यात आले.

 

नगराध्यक्षा सौ. मनीषा वाळेकर, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर, माजी नगराध्यक्ष विजय पवार, आरोग्य सभापती शशांक गायकवाड, नगरसेवक निखिल वाळेकर, सुभाष साळुंखे,नगरपरिषदेचे मुख्याधिकारी देवीदास पवार, शहर अभियंता मनीष भामरे, अभियंता राजेंद्र हावळ, प्रवीण बिर्ला, राजेश तडवी, संजय हिंगमिरे, मुंबई प्रदेश विकास प्राधिकरण चे अभियंता वाकोलकर, वीज मंडळाचे चे कार्यकारी अभियंता सावंत, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अभियंता बसनगार, वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक खरे, संबंधित अधिकारी व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सहकार्याने आमदार डॉ. किणीकर यांच्या पाठपुराव्याने वेल्फेअर सेंटर ते लोकनगरी, स्वामी समर्थ चौक गोविंद तीर्थ पूल ते लोकनगरी पूलाकडे जाणारा रस्ता, लोकनगरी वसाहत ते पालेगावकडे जाणारा डी पी रस्ता, खामकर वाडी व चिंचपाडा ते म्हारळकडे जाणारा डी पी रस्ता, अंबरनाथ पूर्व येथील मोरिवली पाडा ते जय अंबे हॉटेल पर्यंतचा रस्ता व जांभूळ फाटा ते एम.आय.डी.सी. जल शुद्धीकरण केंदाकडे जाणारा रस्ता आदी रस्त्यांच्या सिमेंट कॉक्रीटीकरणाच्या कामाकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्च २०१६ रोजी मंजुरी देऊन रु. ५५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून दिला आहे.

 
 
@@AUTHORINFO_V1@@