जामनेरात अभाविप तर्फे तिरंगा पदयात्रा ७२ मिटर लांब तिरंगा ध्वजाने वेधले शहराचे लक्ष

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Aug-2018
Total Views |

 
 
 
 
 
 
 
जामनेरात अभाविप तर्फे तिरंगा पदयात्रा 
७२ मिटर लांब तिरंगा ध्वजाने वेधले शहराचे लक्ष
 
जामनेर, १४ ऑगस्ट
शहरात भारत,माता की-जय, वंदे मातरम या जय घोषात ढोल ताशांच्या गजरात मंगळवार १४ रोजी  जामनेर शहरात  तिरंगा पदयात्रा काढण्यात आली  . 
 ७२ व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून ७२ मिटर लांब तिरंगा ध्वजाने संपूर्ण शहराचे लक्ष वेधले.
 
पदयात्रेचे आयोजन आखील भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने करण्यात आले . या पदयात्रेची सुरुवात कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, जामनेर येथून नगराध्यक्षा साधनाताई महाजन, प्रमुख वक्ते प्रमोद कराड (अभाविप कोकण प्रांत पूर्व प्रदेश मंत्री) अभाविप शहराध्यक्ष प्रा.गौरव खोडपे, शहर मंत्री मनोज जंजाळ यांच्या हस्ते झेंडा दाखवून करण्यात आली.
पदयात्रा कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय - वसंतराव नाईक चौक  - जिजामाता चौक - महाराणा प्रताप चौक  मार्गे  गांधी चौकात  या पदयात्रेचा समारोप होऊन जाहीर सभा झाली . या सभेला प्रमोद कराड यांनी संबोधित केले .जामनेर शहरातील सर्व शाळा व महाविद्यालयातुन हजारोच्या संख्येने विद्यार्थी, विद्यार्थिनीं व नागरीक  याप्रसंगी  उपस्थित होते.
 
@@AUTHORINFO_V1@@