रुपयाच्या किंमतीत घसरण, सत्तरी गाठली!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Aug-2018
Total Views |

 


 
 
मुंबई : डॉलरच्या तुलनेत रुपया पुन्हा एकदा घसरला आहे. यावेळी रुपयांच्या किंमतीत तब्बल ७० रुपयांची घसरण झाली आहे. यापूर्वी रुपयाच्या किंमतीत इतकी घसरण कधीच झाली नव्हती. सोमवारी रुपयाचे मूल्य ६९.९३ होतं. सोमवारी संध्याकाळी मात्र ते ७०.०८ एवढ झालं. रुपयाच्या किंमतीत आजवर झालेली ही विक्रमीय घसरण आहे.
 

भारताची निर्यात व्यवस्था मंदावली आहे. तसेच चलन फुगवटाही झाला आहे. हे यामागील प्रमुख कारण असल्याचं सांगितलं जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात जर रुपयाचे स्थान भक्कम करायचे असेल तर सरकाने निर्यातीवर भर द्यायला हवा. असे मत अर्थतज्ञांनी व्यक्त केलं आहे.

@@AUTHORINFO_V1@@