आपल्या उद्दिष्टापासून विचलित होवू नका, धेय्यावर ठाम रहा : रामनाथ कोविंद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Aug-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
नवी दिल्ली :  ‘आपल्या उद्दिष्टापासून विचलित होवू नका, आपल्या धेय्यावर ठाम रहा’ असे असे मत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केले आहे. उद्या असणाऱ्या स्वातंत्र्य दिवसाच्या पूर्वसंध्येला दिलेल्या भाषणात रामनाथ कोविंद बोलत होते. ‘भारत देश हा भारतात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाचा आहे, हा केवळ सरकारचा देश नाही’ भारताच्या नागरिकांनी जबाबदारीने आपली कर्तव्य पार पाडणे गरजेचे आहे. त्यांनी उघड्या डोळ्यांनी भारताच्या समस्येवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे असा संदेश यावेळी रामनाथ कोविंद यांनी दिला आहे.
 

 
 
 
महिला सक्षमीकरण : 
 
 
भारताला विकासाच्या दिशेने न्यायचे असेल तर भारतातील महिलांना सुरक्षा प्रदान करणे गरजेचे आहे. त्यांना आत्मविश्वास आणि त्यांच्यातील गुणांची जाणीव करून देणे गरजेचे आहे असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. महिलांना त्यांचे जीवन घडविण्याचा हक्क असायला हवा तसेच त्यांनी जो मार्ग स्वीकारला त्यावर सगळ्यांचा विश्वास हवा तसेच त्यांना त्यांचे मार्ग शोधण्याचा हक्क आहे असेही ते यावेळी म्हणाले. 
 
 
 
 
 
तरुण देशाचे भविष्य : 
 
आजचे तरुण हे देशाचे भविष्य आहे. त्यामुळे तरुणांनी ज्या शैक्षणिक अभ्यासक्रमाची निवड केली असेल त्यात त्याने उत्तम कामगिरी करावी तसेच समाजाच्या आणि देशाच्या फायद्यासाठी काम करावे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. उद्योग जगात, अभियांत्रिकी जगात, तंत्रज्ञान जगात आपल्याला अमाप संधी आहेत त्यामुळे याचा विचार करून तरुणांनी नवीन भारत बनवण्याकडे पाऊल उचलायला हवे असे ते यावेळी म्हणाले. 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@