प्लास्टिकच्या झेंड्यांना केंद्रात आणि राज्यात बंदी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Aug-2018
Total Views |
 
 
 
 
 
नवी दिल्ली : गृह मंत्रालयाने उद्या साजरा करण्यात येणारा ७२ वा स्वातंत्र्य दिना दिवशी प्लास्टिकच्या झेंड्यांस विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे असे सांगितले आहे. गृह मंत्रालयाकडून हे आदेश देण्यात आले आहेत. केंद्र आणि राज्याने उद्या प्लास्टिकचे झेंडे विकू नये तसेच त्यांचा वापर देखील करू नये असे आदेश गृह मंत्रालयाने दिले आहे. प्लास्टिकच्या पिशव्या बंद झाल्याने आता प्लास्टिकचे झेंडे विकू नये असे सांगण्यात आले आहे. 
 
 
 
दिल्ली येथील लाल किल्ल्यावर उद्याच्या दिनाची तयारी जोरात सुरु झाली असून उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून भाषण देणार असल्याने लाल किल्ल्याची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तसेच प्लास्टिकचे झेंडे विकण्यास बंदी देखील क]घालण्यात आली आहे. उद्या दिल्ली येथे ७२ वा स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे मोठ्या शहरांमध्ये जोरदार सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@