अस्वच्छतेच्या बाबतीत कल्याण रेल्वे स्थानक ठरले अव्वल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Aug-2018
Total Views |

 


 
 
मुंबई : कल्याण रेल्वे स्थानक हे मुंबईतील सर्वात अस्वच्छ रेल्वे स्थानक ठरले आहे. देशभरात झालेल्या सर्वेक्षणानुसार स्वच्छतेच्या बाबतीत कल्याण रेल्वे स्थानकाचा क्रमांक सर्वात शेवटचा असल्याचे दिसून आले आहे. क्वालिटी कॉन्सिल ऑफ इंडियाने देशभरातील रेल्वे स्थानकांचे सर्वेक्षण केले होते. कल्याण रेल्वे स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते. या वर्षी सर्व रेल्वे स्थानकांच्या यादीत कल्याण रेल्वे स्थानक ७४ व्या क्रमांकावर आहे. गेल्या वर्षीपेक्षा कल्याण रेल्वे स्थानकाचे नाव या यादीत ११ क्रमांकांनी खाली उतरले आहे.
 
मुंबईतील वांद्रे रेल्वे स्थानकाचे नाव मात्र सर्वांत स्वच्छ रेल्वे स्थानकांच्या यादीत आले आहे. मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाचे नाव मात्र या यादीत मागे पडले आहे. सुधारणा होणाऱ्या रेल्वे स्थानकांमध्ये सीएसएमटी आणि दादर रेल्वे स्थानकाने स्थान मिळवले आहे. सुधारणा होणाऱ्या रेल्वे स्थानकांच्या यादीत सीएसएमटीचा क्रमांक १३ वा आहे. गेल्या वर्षी सीएसएमटी रेल्वे स्थानक या यादीत ४४ व्या स्थानी होते. याच यादीत दादर रेल्वे स्थानकाचा क्रमांक ७० वरून ४९ वर आला आहे. तसेच लोकमान्य टिळक टर्मिनसने या यादीत ६५ व्या क्रमांकावरून ३५ व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. ठाणे रेल्वे स्थानरकानेही सुधारणा करत या यादीत ६८ व्या क्रमांकावरून ५७ व्या क्रमांकाचे स्थान पटकावले आहे. रेल्वे स्थानकावरील स्वच्छता, पार्किंगची व्यवस्था, रेल्वे स्थानकाचे मुख्य प्रवेशद्वार कसे आहे? तसेच प्लॅटफॉर्म, तिकीटघर, रेल्वेस्थानकातील शौचालय, पादचारी पूल, प्रतिक्षागृहे यांची नियमितपणे स्वच्छता केली जाते का? या निकषांवरून व प्रवाशांकडून मिळालेल्या अभिप्रायाद्वारेही हे सर्वेक्षण करण्यात आले.
@@AUTHORINFO_V1@@