दमदार पावसामुळे पाणीसाठ्यात वाढ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Aug-2018
Total Views |


 


मुंबई : यंदा मुंबईला पाणीपुरवठा करणार्या तलाव परिसरात दमदार पाऊस पडत असल्याने सध्या तलावांमध्ये ८८ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. मुंबईला रोज ३८०० दशलक्ष पाणीपुरवठा केला जातो. सध्या २६७ दिवस पुरेल एवढा पाणीसाठा आहे. त्यामुळे मुंबईकरांची पाणीटंचाईची चिंता मिटली आहे.

 

मुंबईला मोडकसागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार भातसा अशा सात तलावांमधून दररोज ३९०० दशलक्ष लीटरमधून १५० दशलक्ष लीटर पाणी भिवंडी आणि ठाण्याला दिले जाते. मुंबईला ३१ ऑक्टोबरपासून पुढील वर्षभरासाठी सर्व तलावांमध्ये मिळून १४ ,४७ ,३६३ दशलक्ष लीटर पाण्याची आवश्यकता असते. तलाव क्षेत्रात सध्या मुबलक पाऊस पडत असल्याने पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. जुलै महिन्यात पडलेल्या जोरदार पावसात तानसा, मोडकसागर, तुलशी, विहार, मध्य वैतरणा हे तलावही भरले आहेत. तलाव क्षेत्रात गेल्या तीन-चार दिवसांपासून पडणार्या दमदार पावसामुळे पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. ऑगस्ट सप्टेंबर महिन्यांमध्ये पडणारा पाऊस त्यानंतर जमा होणार्या पाणीसाठ्याचा आढावा घेऊन पालिकेकडून दि.1 ऑक्टोबरला तलावांमधील पाणीसाठ्याचे वर्षभराचे नियोजन केले जाणार आहे.

@@AUTHORINFO_V1@@