कॉसमॉस बँकेवर हँकर्सचा दरोडा ; ९४ कोटी रुपये केले लंपास

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Aug-2018
Total Views |



पुणे : ‘नाते आपुले शतकांचे ; विश्वासाचे, आपुलकीचे’ असे म्हणत घराघरापर्यंत पोहोचलेल्या कॉसमॉस बँकेवर देखील आता चोरट्यांची वक्रदृष्टी पडली आहे. बँकेच्या ग्राहकांच्या व्हिसा आणि रूपे कार्डची गोपनीय माहिती मिळवून काही अज्ञात हँकर्सनी बँकेतून तब्बल ९४ कोटी रुपये लंपास केल्याची घटना आज सकाळी पुण्यात घडली आहे. यासंबंधी बँकेचे अधिकारी सुहास गोखले यांनी चतु:श्रुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून या विरोधात अज्ञात इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


गोखले यांनी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काल सकाळी कॉसमॉस बँकेच्या शिवाजीनगर येथील मुख्य कार्यालयातील सर्व्हरवर काही हँकर्सनी हल्ला करून तब्बल ९४ कोटी ४२ लाख रुपयांची अफरातफर केली आहे. यामध्ये ग्राहकांच्या रूपे आणि व्हिसा कार्डच्या माहितीचा वापर करून १४ हजाराहून अधिक व्यवहार केले आहे. यामध्ये व्हिसा कार्डमधून ७८ कोटी रुपये आणि रूपे कार्डहून २ कोटी ५० लाख रुपयांचे गैरव्यवहार केले आहे. तसेच काल सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास हॉंगकॉंगमधील ए.एल.एम. ट्रेडिंग लिमिटेडच्या बँक खात्यावर १३ कोटी ९२ लाख रुपये वळवून घेतले आहेत, अशी असे एकूण ९४ कोटी ४२ लाख रुपयांची अफरातफर केल्याचे गोखले यांनी सांगितले आहे.

 
 
 
दरम्यान या घटनेनंतर सार्वजनिक बँकांच्या सुरक्षे मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या वर्षीच्या सुरुवातील पंजाब नॅॅशनल बँकेमध्ये देखील अशाच प्रकारची घटना घडली होती. यामध्ये पीएनबीमधून १४ कोटी रुपयांची अफरातफर केली होती. या घटनेतील आरोपींना अटक करण्याअगोदरच पुन्हा एकदा अशी घटना घडल्यामुळे सामन्य ठेवीदारांमध्ये आणि ग्राहकांमध्ये काळजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
@@AUTHORINFO_V1@@