माजी लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी यांचे निधन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Aug-2018
Total Views |



कोलकत्ता : लोकसभेचे माजी अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी यांचे आज पहाटे कोलकत्ता येथे निधन झाले आहे. ते ८९ वर्षांचे होते. कोलकत्ता येथील रुग्णालयात उपचार घेत असताना हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले आहे. त्यांच्या अशा जाण्याने राजकीय क्षेत्रातून सध्या हळहळ व्यक्त केली जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून चॅटर्जी हे कोलकत्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते. वृद्धपणामुळे त्यांची प्रकृती कायम अस्थिर राहत होती. त्यामुळे तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरु होते. परंतु काल रात्री त्यांची प्रकृती अधिकच खालावल्यामुळे त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यानंतर आज पहाटे हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली.





कोण होते सोमनाथ चॅटर्जी ?


हिंदू महासभेचे संस्थापक सदस्य आणि अध्यक्ष राहिलेले निर्मल चंद्र चॅटर्जी यांचे ते पुत्र होते. सोमनाथ यांचे वडील जरी हिंदू महासभेचे अध्यक्ष राहिले असले तरी देखील सोमनाथ यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीला कम्युनिस्ट पक्षासह सुरुवात केली होती. भारतीय जनता पक्ष आणि चॅटर्जी यांचे अनेक वेळा वाद देखील झाले होते. तसेच तब्बल १० वेळा ते लोकसभेवर निवडणून आले होते.
@@AUTHORINFO_V1@@