होमियोपॅथीची मूलभूत तत्त्वे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Aug-2018
Total Views |


 


मागील भागात आपण होमियोपॅथीच्या पहिल्या तत्त्वाचा अभ्यास केला. आजच्या भागात आपण दुसऱ्या तत्त्वाबद्दल जाणून घेऊया. ते तत्त्व म्हणजे ‘एक औषधाचा नियम’ अर्थात ‘लॉ ऑफ सिम्प्लेक्स.’

 

डॉ. सॅम्युअल हॅनेमान यांनी त्यांच्याऑरगॅनॉन ऑफ मेडिसीनया पुस्तकाच्या परिच्छेद क्रमांक २७२ मध्ये याबद्दल सूचना केलेल्या आहेत. हॅनेमान म्हणतात की, “आजारी माणसाला त्याच्या प्रकृतीनुसार एकावेळी एकच औषध दिले जावे.” यामागची कारणे पुढील प्रमाणे आहेत.

 

(1) होमियोपॅथीची औषधे जेव्हा सिद्ध केली गेली, तेव्हा एकच औषध एका वेळी सिद्ध केले गेले. या औषधाचा निरोगी माणसावर होणारा परिणाम हा तपासून त्यातील लक्षणे चिन्हे नोंदवून ठेवली जातात. ही लक्षणेमटेरिया मेडिकाया पुस्तकात नोंदणी करून ठेवली जातात. एका वेळी एकाच औषधाची सिद्धता होत असल्यामुळे त्या औषधाचे गुणधर्म कळून येतात. एकाच वेळी अनेक औषधे जर निरोगी माणसावर सिद्ध केली गेली, तर त्यातून मिळणारी लक्षणे चिन्हे ही नक्की कुठल्या औषधामुळे येत आहेत, हे कळणारच नाही औषधांचा नीट अभ्यास केला जाऊच शकत नाही.

 

(2) रुग्णांमध्ये आढळणारी रोगाची अवस्था ही एकच असते त्यामुळे या अवस्थेला पूरक समान असे एकच औषध असते. म्हणून होमियोपॅथीमध्ये कॉम्बिनेशन करून म्हणजेच एकत्र मिसळून औषधे देत नाहीत.

 

(3) जर एकापेक्षा जास्त औषधे ही रुग्णाला एकाच वेळी दिली गेली, तर मग डॉक्टरांना नक्की कुठल्या औषधाच्या परिणामामुळे रोगी बरा झाला हे कळणार नाही. त्याचप्रमाणे कुठल्या औषधाचा नक्की काय परिणाम वा दुष्परिणाम हा रोग्याच्या आरोग्यावर होत आहे, याचेही ज्ञान होणार नाही. भविष्यात मग त्या औषधांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उभे राहील त्यांच्या गुणवत्तेबाबत डॉक्टर अनभिज्ञच राहतील.

 

(4) जर एकावेळी अनेक औषधे रुग्णाला दिली गेली, तर या सर्व औषधांचा एकत्रित परिणाम हा शरीरावर दिसू लागतो समानतेच्या आधारावर आधारित होमियोपॅथीला हे मान्य नाही. एकत्रित औषधांच्या परिणामांमुळे शरीराला फायदा होता नुकसानच जास्त होते. हल्ली बाजारात विविध औषधांच्या कंपन्या वेगवेगळी संयुगे आणत आहेत. या संयुगांमध्ये एकापेक्षा अधिक औषधांचे मिश्रण असते. ही मिश्रणे होमियोपॅथीच्या तत्त्वांच्या पूर्णपणे विरोधात आहेत. ही अशी मिश्रणे (कॉम्बिनेशन) कधीही रुग्णांना देऊ नयेत. त्यामुळे तात्पुरते बरे वाटत असले तरी या अशा मिश्रणांमुळे माणसाच्या शरीरावर दूरगामी वाईट परिणाम होत असतात त्यामुळे त्याला नवनवीन आजार होण्याची शक्यता असते.

 
 

याशिवाय अनेक औषधे एकाचवेळी पोटात गेल्यामुळे या औषधांचेच एक संयुग बनते या संयुगांचा विपरीत परिणाम मानवी शरीरावर होत असतो. म्हणून एकावेळी एकच औषध द्यावे, असे डॉ. हॅनेमान यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. याशिवाय प्रत्येक शरीरात एकचचैतन्यशक्तीअसते त्यामुळे त्याचैतन्यशक्तीला बरे करण्यासाठी एकाच औषधाची गरज असते, म्हणून एकावेळी एकच औषध हे रुग्णाला दिले जाते. पुढील भागात आपण होमियोपॅथीच्या अजून काही मूलभूत तत्त्वांचा अभ्यास करू या. परिणाम आणि ताण मानसिक आरोग्य याबद्दल पुढील लेखात जाणून घेऊ या..

 
 
 डॉ. मंदार पाटकर
@@AUTHORINFO_V1@@