एकर्स क्लब आणि अॅकॅडमीकडून रस्ताकोंडी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Aug-2018
Total Views |


 

मुंबई : चेंबूर येथील एकर्स क्लब आणि दी ग्रीन एकर अॅकॅडमीमधील रस्त्यामध्ये सहा स्पीडब्रेकर लावून आणि दोन्ही बाजूला शाळेच्या स्कूलबस अनधिकृतपणे पार्किंग करुन रस्ताकोंडी केली जात आहे, असा आरोप सिंधी सोसायटीतील रहिवाशांनी केला आहे.
 

पूर्वी खाजगी मालमता असलेला हा भाग काही वर्षांपूर्वी एकर्स क्लबचे मालक नटवर पारीख यांनी घेतला. त्यावेळी तो रस्ता विकास आराखड्यात प्रस्तावित होता, परंतु तो रस्ता बंद ठेवण्यात आला. विकास आराखड्यात रस्ता प्रस्तावित असल्यामुळे त्यांना त्या बदल्यात जास्त एफएसआय मिळाला. त्यानुसार त्यांनी बांधकाम वाढवले, परंतु चार ते पाच वर्षांपासून रस्ता बंद ठेवला. या प्रश्न चा येथील स्थानिक रहिवाशांनी महापालिकेकडे सातत्याने पाठपुरावा केला. अखेर आठ महिन्यांपूर्वी पालिकेने भिंत तोडून नागरिकांसाठी रस्ता खुला करून दिला. असे असताना एकर्स क्लब आणि अॅकॅडमीकडून विविध कारणे देऊन हा रस्ता बंद ठेवण्यात येत आहे, असे रहिवासी ऋषी मारवाह यांनी सांगितले.

 

तसेच येथील शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळा भरताना एक तास आणि शाळा सुटताना एक तास रस्ता बंद ठेवला तरी चालेल, परंतु इतर वेळी तो सुरू असायला हवा. रस्त्यामध्ये एकूण सहा गतिरोधक लावले असल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूला शाळेच्या बसेस लावून रस्ताकोंडी केली जाते. तसेच खाली शाळा सुरू असूनही वरच्या मजल्यांचे काम सुरू असते, त्यामुळे एखादी दुर्घटना घडू शकते, असेही ते म्हणाले.

 

 
रस्ता बंद ठेवल्याबाबत रहिवाशांच्या तक्रारी आल्यानंतर भिंत तोडून पालिकेने रस्ता खुला करून दिला होता. येथे जर बसेस लावून अडथळा केला, तर त्याबाबत पाहणी करण्यात येईल.

आशा मराठे, स्थानिक नगरसेविका

 

शाळेचे बांधकाम दुपारी शाळा सुटल्यावर सुरू होते. ते रात्री 9 वाजता बंद होते. कामासाठी लागणार्‍या सर्व परवानग्या घेण्यात आल्या आहेत. येथे उभ्या राहणार्‍या बसेस कंपनीच्या नसून कंत्राटदाराच्या आहेत. त्या कंत्राटदाराला गाडी लावू नये, म्हणून सांगितले जाईल. तरी त्याने गाड्या ठेवल्या, तर त्याला दंड आकारण्यात येईल.

अशोक पॉल, एकर्स क्लब

@@AUTHORINFO_V1@@