सोमानाथदा मोठ्या भावाप्रमाणे होते : सुमित्रा महाजन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Aug-2018
Total Views |

 
 
 
नवी दिल्ली :  "सोमनाथ 'दा' म्हणजेच सोमनाथ चॅटर्जी माझ्यासाठी माझ्या मोठ्या भावाप्रमाणे होते. आमच्या विचारधारा नक्कीच वेगळ्या होत्या, मात्र त्यांच्याकडून मी खूप काही शिकले आहे." अशा भावना लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी आज व्यक्त केल्या. माजी लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी यांचे आज निधन झाले. त्यांच्या जाण्याने राजकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
 
"ज्यावेळी १९८९ मध्ये मी पहिल्यांदा संसदेत पाऊल ठेवले, त्यावेळी त्यांच्याकडून भरपूर काही शिकायला मिळायले. प्रत्येक मुद्दा ते सर्व नियम लक्षात ठेवत उपस्थित करायचे. त्यांनी कधीच कुठल्याही नियमाचे उल्लंघन केले नाही." असेही त्या यावेळी म्हणाल्या. "त्यांचा लोकसभा अध्यक्ष असतानाचा कार्यकाळ माझ्यासाठी मार्गदर्शक ठरला." अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.
 

 
 
 
आज माजी लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने कलकत्ता येथे निधन झाले. ते ८९ वर्षाचे होते. गेल्या काही दिवसांपासून चॅटर्जी हे कोलकत्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते. वृद्धपणामुळे त्यांची प्रकृती कायम अस्थिर राहत होती. त्यामुळे तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरु होते. परंतु काल रात्री त्यांची प्रकृती अधिकच खालावल्यामुळे त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यानंतर आज पहाटे हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली.
@@AUTHORINFO_V1@@