आरक्षणासाठी धनगर समाजाचे रास्ता रोको आंदोलन
जळगाव, 13 ऑगस्ट
धनगर समाजास आरक्षण द्या या मागणीसाठी जिल्हयातील पहूर व रावेर येथे धनगर समाजबांधवांनी शांततेत रास्तारोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे वाहतुक ठप्प झाली. कोणताही गैरप्रकार होवू नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.
पहूर ता.जामनेर
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करुन अनुसुचित जातीच्या आरक्षणासाठी धनगर समाज संघर्ष समिती पहूर व परिसरातील सखल धनगर समाजतर्फे सकाळी 9 वाजेला रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.पहुर बसस्थानक परिसरात झालेल्या या आंदोलनामुळे जळगाव - औरंगाबाद महामार्गावरील वाहतुक प्रभावीत झाली.आंदोलनात वाकोद, पाळधी, शेंदुर्णी, तोंडापूर, सांगवी, हिवारी, हिवरखेडे, पिंपळगाव, जांभोळ, वडगाव आदी परिसरातील सकल धनगर समाज सहभागी झाला.
यावेळी माजी जि.प.सदस्य राजधर पांढरे यांनी राज्यघटनेत धनगर जातीचा उल्लेख धनगड असा झाल्यामुळे सकल धनगर समाज एस.टी.आरक्षणापासून वंचीत राहिला असल्याचे सांगीतले.राज्य शासनाने ठोस पाऊले उचलून धनगर समाजाला अनुसुचित जातीचे प्रवर्गाचे आरक्षण द्यावे अशी मागणी लावून धरली.धनगर समाज संघर्ष समितीचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख रामेश्वर पाटील यांनी सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे नाव द्यावे. महाराष्ट्रात वनचराईची परवानगी देण्याचे आपल्या मनोगतात सांगितले. तसेच पं.स.सदस्य बाबुराव घोंगडे, शैलेश पाटील, गणेश पांढरे यांनी सुध्दा मनोगत व्यक्त केले. या आंदोलनात सरपंच निता पाटील, जि.प.सदस्य अमित देशमुख, साहेबराव देशमुख, संजय पाटील, अरविंद देशमुख, अरुण घोलप, शाम सावळे, संजय देशमुख, राजू पाटील, समाधान पाटील, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.या प्रसंगी विविध मागण्यांचे निवेदन पहूर मंडळ अधिकारी निंबोळकर,उपविभागीय पोलीस अधिकारी केशव पातोंड यांना देण्यात आले.
रावेर
येळकोट – येळकोट जय मल्हाच्या गजरात धनगर समाजबंाधवांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात राष्ट्रीय महामार्गालगत रास्ता रोको आंदोलन केले. सुमारे दोन तास हे आंदोलन चालले. याआंदोलनात धनगर समाज संघर्ष समितीचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी शिक्षण सभापती सुभाष धनके,धनगर समाज जिल्हा संघटक संदीप सावळे, रावेर न.पा.चे उपनगराध्यक्ष अॅड. सूरज चौधरी,अनिल चौधरी, भा.ज.पा. जिल्हा उपाध्यक्ष पदमाकर महाजन, भा.ज.पा. तालुका उपाध्यक्ष अॅड. प्रविण पाचपोहे, डॉ.ताराचंद सावळे, जिल्हा उपाध्यक्ष लखन सावळे, माजी सरपंच दिलीप धनके, स्वप्निल लासूरकर, बाजार समिती संचालक प्रमोद धनके, डॉ.भगवान कुयटे, रमेश पाटील, दिलीप सोनवणे, रमेश सावळे, मोहन बोरसे, गणेश बोरसे, राजेंद्र कावडकर, प्रविण अजलसोंडे, ज्ञानेश्वर अजलसोंेडे, रमेश वैद्यकर, यशवंत धनके, ज्ञानेश्वर हिवराळे, सुरेश हिवराळे, देविदास हडपे, भास्कर कुयटे, डी.डी.वाणी, तुषार कचरे, अमृत पाचपोहे, पांडुरंग कुयटे, योगेश बोरसे, योगेश पाटील, ज्ञानेश्वर केळकर, पांडुरंग अंजलसोंडे, विनोद अंजलसोंडे आदी समाजबांधव सहभागी होते. फौजदार दीपक ढोमणे आणि सहका-यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला.