जगण्यास सुलभ शहरांच्या निर्देशांकात पुणे सर्वप्रथम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Aug-2018
Total Views |

 
 
 
नवी दिल्ली : राहण्यासाठी सुलभ शहरांच्या निर्देशांकात पुण्याचा प्रथम क्रमांक आला आहे. पुणे हे राहण्यासाठी सर्वोत्तम असल्याचा निर्वाळा केंद्रीय गृहनिर्माण व नगरविकास मंत्रालयाने दिला आहे. मंत्रालयातर्फे आज जाहीर केलेल्या यादीत ही क्रमवारी देण्यात आली आहे. केंद्रीय गृहनिर्माण व नगरविकास मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी आज नवी दिल्ली येथे ही यादी जाहीर केली.
 
 
पुण्याचा नावलौकिक देशभरात विद्येचे माहेरघर म्हणून आहेच मात्र आता राहण्यासाठी सर्वांत चांगल्या शहरांच्या यादीतही पुण्याने अव्वल स्थान पटकावले आहे. या यादीत पुण्यासह महाराष्ट्रातील अन्य तीन शहरांचा देखील समावेश करण्यात आला आहे. दुसऱ्या क्रमांकावर नवी मुंबई, तिसऱ्या क्रमांकावर ग्रेटर मुंबई तर सहाव्या स्थानावर ठाणे शहराचा समावेश आहे.
 
जगण्यासाठी सर्वोत्तम १० शहरे :

१. पुणे 
२. नवी मुंबई
३. ग्रेटर मुंबई
४. तिरुपती
५. चंदीगड
६. ठाणे
७. रायपूर
८. इंदौर
९. विजयवाडा
१०. भोपाळ

प्रशासन, सामाजिक संस्था, आर्थिक आणि भौतिक पायाभूत सुविधा या चार निकषांच्या आधारावर ही निवड करण्यात आली आहे.
 
दरम्यान पुण्याने पटकावलेल्या या स्थानावर पुण्याचे खासदार अनिल शिरोळे यांनी समाधान व्यक्त केले आहे. राहण्यासाठी सुलभ शहरांच्या यादीत पुण्याने प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल त्यांनी पुणेकरांचे अभिनंदन केले आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@