'अटलजी' पुस्तकावर परिसंवादाचे आयोजन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Aug-2018
Total Views |


 


मुंबई : भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित सारंग दर्शने लिखित 'अटलजी : कविहृदयाच्या राष्ट्रनेत्याची चरितकहाणी' हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. याच पुस्तकावर आधारित महाराष्ट्र एकता अभियान व राजहंस प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. हा परिसंवाद रविवार दि. १९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, शिवाजी पार्क, दादर, मुंबई येथे संपन्न होणार आहे.

 
 
 

या परिसंवादाला प्रमुख वक्ते म्हणून, राज्य पुनर्वसन प्राधिकरण मंत्री माधव भांडारी, शिर्डी साईबाबा संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे, अटलजी पुस्तकाचे लेखक सारंग दर्शने, राजहंस प्रकाशनचे संपादक आनंद हर्डीकर हे उपस्थित राहणार असून निमंत्रक मिलिंद तुळसकर व संयोजक अनिरुद्ध गुरव यांनी या परिसंवादाला उपस्थित राहण्याचे अवाहन केले आहे.

@@AUTHORINFO_V1@@