थर्माकोल बंदीमध्ये इकोफ्रेंडली मखरांना पसंती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Aug-2018
Total Views |



डोंबिवली : महिन्याभरावर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. परिणामी गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या सजावटीच्या सामानानी शहरातील बाजारपेठा हि सजू लागल्या आहेत. दरम्यान नुकतीच राज्य शासनाच्या वतीने घालण्यात आलेली प्लास्टिक व थर्माकोल ची बंदी पाहता यंदा इको फ्रेंडली मखरांना सर्वाधिक पसंती असल्याचे दिसून येते

 

पुढील महिन्यात १३ सप्टेंबर रोजी गणरायाचे आगमन होत आहे . यासाठी शहरातील बाजार पेठेत गणेशाच्या मूर्तींचे तसेच सजावटीचे सामन दिसू लागले आहेत यात नाविन्य पूर्ण काही तरी शोधण्याचा प्रयत्न गणेशभक्तान कडून केला जात आहे . सादरणतः या सजावटीच्या सामनातील मखर खरेदीला सुरुवात झाली आहे . मात्र यंदा प्लास्टिक तसेच थर्माकोलला बंदी आल्याने या गणेशभक्तांना सक्तीने इकोफ्रेंडली मखर खरेदी करणे बंधनकारक पडत आहे. यात कागदीमखर , फुलांचे व कापडी मखर, तसेच लाकडाचे मखर, साईन बोर्ड हि उपलब्ध आहेत .मात्र या मखरांच्या किमतीत कमालीची वाढ आहे . यात कागदी मखर हे सुमारे ७०० रु पासून ७ ह्जार रु पर्यंत असून फुलांचे १२०० रुपयांचे तर कापडी १५०० पासुन ५ हजार रु पर्यंत याच बरोबर लाकडी मखर २ हजार रु पर्यंत विकले जात आहे. तसेच अन्य सजावट उपयोगी वस्तूनी बाजारात शोभा आणली आहेत यात फुलाच्या माळा , रंगीत कापड , झालर , मण्यांची तोरणे उपलब्ध आहेत.

 

थर्माकोल स्वस्त असल्याने तसेच सजावटीच्या कामासाठी पूरक असल्याने त्यांचा वापर सरास केला जाई मात्र त्यामुळे प्रदूषण होत असे त्याच्यावरची बंदी हि योग्य आहे मात्र या बंदी मुळे या इकोफ्रेंडली मखरांचे दर वाढले आहेत या वाढलेल्या दरामुळे या मखर विक्रेत्यांना चांगले दिवस आले आहेत तसेच हे इकोफ्रेंडली मखर एकदा खरेदी केले तर दरवर्षी नव्याने काहीतरी शोधण्याची गरज लागणार नसल्याच्या समिश्र प्रतिक्रिया गणेशभक्तान कडून व्यक्त केल्या जात आहेत . तसेच पर्यायच नसल्यामुळे लोकांना आपसुकच इकोफ्रेंडली मखर खरेदी करावे लागत असल्याची प्रतिक्रिया मखर विक्रेते अनिल मडवी यांनी दिली

 

गणेशमूर्तींच्या दरात वाढ

दरम्यान यंदा गणेशमूर्तींच्या दरात हि वाढ झाली आहे . यात प्लास्टर ऑफ परीस च्या मुर्त्यान मध्ये २५ ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे तर शाडू च्या मूर्ती १५ ते २० टक्क्यांनी महागल्या आहेत .

@@AUTHORINFO_V1@@