जनकल्याण समितीच्या डॉ. प्रभाकर पटवर्धन स्मृती रुग्णालयात आय.सी.यू.चे उद्घाटन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Aug-2018
Total Views |



पनवेल : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती संचलित डॉ. प्रभाकर पटवर्धन स्मृती रुग्णालय, पनवेल येथील आयसीयू विभागाचे रविवार, दि. १२ ऑगस्ट रोजी उद्घाटन झाले. या विभागासाठी संजय आचार्य यांनी आर्थिक साहाय्य केले होते. आचार्य यांच्या मातोश्रींच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न झाला. डॉ. पटवर्धनांनी एका रोपट्याचे आज विशाल वटवृक्षात रुपांतर झाल्याचे समाधान श्रीमती आचार्य यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. सदर कार्यक्रमास जनकल्याण समितीचे प्रांत अध्यक्ष डॉ. रवींद्र साताळकर संस्थेचे कार्यवाह, श्री.जयंत टिळक, सहकार्यवाह डॉ. दीपक कुलकर्णी, श्री. अजय आचार्य, डॉ. ययाती गांधी, श्रीमती. नीलाताई पटवर्धन तसेच संस्थेचे सभासद रुग्णालयातील सेवक वर्ग उपस्थित होताजनकल्याण समिती संचालित या रुग्णालयात अल्प दरात रुग्णसेवा उपलब्ध करून दिली जाते. तसेच विविध वैद्यकीय शिबिरेही आयोजित केली जातात. आजूबाजूच्या गावांतील तसेच झोपडपट्टी परिसरातील नागरिकांसाठी शिबिरांचे आयोजन केले जाते.

@@AUTHORINFO_V1@@