दत्ता दळवी यांचा पदाचा राजीनामा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Aug-2018
Total Views |



शिवसेनेचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर


मुंबई – शिवसेनेचे माजी महापौर आणि ईशान्य मुंबई विभाग क्रमांक सातचे विभागप्रमुख दत्ता दळवी यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवला आहे. मात्र, त्यांनी राजीनामा दिला नसून त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहे. शिवसेनेच्या ईशान्य मुंबईतील महिला पदाधिकाऱ्यांमधील गटबाजी नुकतीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निदर्शनास आली होती. त्याला काही तास होताच आणखी एक नवा वाद समोर आला आहे. ईशान्य मुंबई विभाग क्रमांक सातचे विभागप्रमुख दत्ता दळवी यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्षप्रमुखांकडे सोपविला आहे. ईशान्य मुंबईतील नव्या पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका शिवसेनेने आपल्या मुखपत्रातून रविवारी जाहीर केल्या होत्या. त्यातच दत्ता दळवी यांनी स्वतःच्या पदाच्या दिलेल्या राजीनाम्याची माहिती देण्यात आली होती. त्यांनी वैयक्तीक कारणामुळे आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे सांगितले जात असले तरी त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहे. तर, मुलुंडचे उपविभागप्रमुख जगदीश शेट्टी यांचीदेखील शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी बैठका घेतल्यामुळे शाखाप्रमुख दीपक सांवत यांचीही पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

@@AUTHORINFO_V1@@