15 ऑगस्ट रोजी महागौरव पर्वजळगाव भाजपाचे मिशन 2 खासदार 11 आमदार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Aug-2018
Total Views |
 
 
 

15 ऑगस्ट रोजी ' महागौरव पर्व '
जळगाव भाजपाचे मिशन 2 खासदार 11 आमदार

जळगाव, 13 ऑगस्ट
15 ऑगस्ट पासून जळगाव जिल्हा भाजपाने संघटनात्मक भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केले असून लोकसभेच्या दोन्ही जागांसह विधानसभेच्या 11 जागांवर भाजपाचे उमेदवार निवडून आणण्याचे लक्ष गठित केले आहे. त्या अनुषंगाने बांधणी सुरु असल्याची माहिती भा.ज.पा.जिल्हाध्यक्ष्य उदय वाघ यांनी पत्र परिषदेत दिली. यावेळी खा.अे.टी.नाना पाटील, खा.रक्षा खडसे, अॅड.किशोर काळकर, प्रा.डॉ.सुनिल नेवे, जि.प.सभापती पोपटतात्या भोळे, पी.सी.पाटील, सदाशिव आबा पाटील उपस्थित होते.
 
उदय वाघ यांनी माहिती देतांना 15 ऑगस्ट ला 72 वा स्वातंत्र्यदिवस असून त्या निमित्ताने ' महागौरव पर्व ' साजरे करण्यात येणार आहे. या अंतर्गत जिल्हयात 500 ठिकाणी सकाळी 10 वा. ध्वजवंदनाचा कार्यक्रम होणार आहे.यात तरुण व नागरिक बहुसंख्येने सहभागी होतील. तसेच 30 ठिकाणी दुचाकी रॅली काढण्यात येणार आहे. यात खासदार , भाजपाचे आमदार आणि लोकप्रतिनिधी सहभागी होणार आहेत. 15 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट या कालखंडात 3 हजार 300 बुथचे एक बुथ प्रमुख आणि 25 कार्यकर्ते असे गठन करण्यात येणार आहे. नवमतदार नोंदणी आणि मतदारयादी वाचन केले जाणार आहे. 30 ऑगस्ट नंतर पेज प्रमुखाची नेमणूक होईल.
 
 
 मेळाव्यांचे आयोजन 
1 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर दरम्यान जिल्हयात 85 ठिकाणी पक्षाचे मेळावे घेण्यात येणार आहेत. यात जि.प.चे 68 गट आणि शहरातील काही भाग समाविष्ठ असेल. यामेळाव्यात बुथ कमेटी, त्या-त्या भागातील लोक प्रतिनिधी उपस्थित राहतील. खा.अे.टी.पाटील, खा.रक्षा खडसे, भा.ज.पा.चे आमदार त्यात मार्गदर्शन करतील . ज्या ठिकाणी भाजपाचे आमदार नसतील त्या ठिकाणी जि.प.सभापती मेळाव्यास मार्गदर्शन करतील.
 
 
बुथ प्रमुखांना प्रशिक्षण आणि मिशन 2019
20 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर दरम्यान प्रत्येक तालुक्यात बुथ प्रमुखांचे प्रशिक्षण वर्ग घेण्यात येणार आहेत. जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघाच्या दोन्ही जागा व जिल्हयातील विधानसभेच्या 11 जागा निवडूण आणण्यासाठी संघटना अशा प्रकारे सज्ज करण्यात येणार आहे. तसेच लोकप्रतिनिधींना कार्यक्रम देण्यात येणार असून केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या योजनांच्या लाभार्थींचा मेळावा घेण्यात येतील.
 
 
दोन्ही लोकसभा मतदार संघाच्या पदाधिका-यांच्या बैठका
13 रोजी जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघातील पक्षाच्या पदाधिका-यांच्या बैठका भाजपा कार्यालय वसंत स्मृती येथे घेण्यात आली असून त्यांना कार्यक्रमाचे नियोजन देण्यात आले आहे.
भाजपाने अगामी निवडणूकिसाठी लक्ष निर्धारीत केले असून त्या अनुषंगाने संघटनात्मक बांधणी जोरदार सुरू केली आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@