केजरीवाल आणि सिसोदिया यांच्या अडचणीत वाढ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Aug-2018
Total Views |
 
 
 
 
 
नवी दिल्ली : नवी दिल्लीचे मुख्य सचिव अंशु प्रकाश यांच्या मारामारी प्रकरणामध्ये दिल्ली पोलिसांनी पतियाळा न्यायालयामध्ये आरोपपत्र दाखल केले आहे. पोलिसांनी १५३३ पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. हे आरोपपत्र दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या विरुद्ध दाखल करण्यात आले असल्याने केजरीवाल आणि सिसोदिया यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. 
 
 
 
या दोघांव्यतिरिक्त ११ लोकांच्या विरुद्ध हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे एकूण १३ जणांच्या विरुद्ध हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. १९ फेब्रुवारी २०१८ ला रात्री १२ वाजता अंशु प्रकाश यांना रेशनकार्ड या विषयावर चर्चा करण्यासाठी बोलवण्यात आले होते. यावेळी आम आदमी पक्षाच्या लोकांनी मला मारहाण केली असल्याचा अंशु प्रकाश यांनी आपच्या लोकांवर लावला.
 
 
 
यावेळी घटनास्थळी अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया हे देखील उपस्थित होते. मात्र त्यांनी यावेळी कोणताही पुढाकार न घेता ते केवळ हे पाहत राहिले असे अंशु प्रकाश यांनी म्हटले आहे. त्यामुळे दिल्ली पोलिसांनी अन्य आरोपी, केजरीवाल आणि सिसोदिया यांच्या विरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. 
 
@@AUTHORINFO_V1@@