स्वातंत्र्यावर बोलू काही...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Aug-2018
Total Views |


 


‘स्वातंत्र्य’ हा शब्द उच्चारताच ब्रिटिशांविरोधातील भारतभूमीच्या स्वातंत्र्याचा संघर्ष आणि त्यासाठी लाखोंनी केलेले बलिदान स्मरणात येते. पण, केवळ हा देश स्वतंत्र झाला असला तरी या देशात कित्येकजण अजूनही पारतंत्र्यात जगत असतात. बंधनांच्या साखळदंडात जखडलेले... वेदनेने अवघडलेले दु:खी जिणे... हे पारतंत्र्य असते विचारांच्या मतभेदाचे... बळजबरीचे... लाचारीचे.... खरेतर आपल्याला हवे तसे स्वछंद जगणे म्हणजे स्वातंत्र्य. विचारांचे, सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि म्हणाल त्याच्याशी जोडता येणारे. एकूणात व्यक्तिस्वातंत्र्य. मनाला वाटेल, पटेल ते करण्याची मुभा. कुणाचाही आपल्या निवडींवर अंकुश नाही, पण स्वातंत्र्याबरोबर आलेल्या जबाबदारीचेही तितकेच सखोल भान... हे स्वातंत्र्य असते आपल्या जगण्याचा आत्मा... जीवनाची नि:शब्द प्रेरणा... तेव्हा, उद्या आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करताना जरा वैयक्तिक स्वातंत्र्याच्याही कक्षांचा विचार करू या. स्वत:लाच विचारूया, “मी खरंच स्वतंत्र आहे का?” चला, आज याच स्वातंत्र्यावर बोलू

 

आयुष्यातील विविध अनुभव व्यक्तीला स्वत:चे विचार, भावना दृष्टिकोन समृद्ध करायला मदत करतात. शिवाय समृद्धीच्या पलीकडे जाऊन स्वत:चे यावरील स्वातंत्र्य मिळविण्यासही मदत करतात. हे विचार, या भावना, हा दृष्टिकोन हा माझा स्वत:चा आहे, हे व्यक्तीला जेव्हा कळते तेव्हा ती खऱ्या अर्थाने स्वतंत्र आहे असे म्हणता येईल. माणसाची इच्छा निर्णयक्षमता मानवी अनुभवातूनच आकारास येते. आपल्या अवतीभवती असलेली परिस्थिती तिच्याशी कितपत जुळवून घेता येईल, याची बेरीज-वजाबाकी करत आपण नेमका स्वत:ला पटेल असा निर्णय घेत असतो. त्याचे विश्लेषण माणूस स्वत:च्या स्वातंत्र्याची कल्पना समाजाची त्या-त्या परिस्थितीची गरज पाहत करत असतो, हे निश्चित. कणखर समाजाचा पाया हा जसा अन्यायकारक दडपणातून व्यक्तीला तिचे व्यक्तिस्वातंत्र्य देण्यावर जितका अवलंबून आहे, तितकाच तो समाजातील इतर व्यक्तींच्या विचार मतांच्या विविधतेला सन्मान देऊन व्यक्ती समाजामध्ये समतोल साधण्यामध्येसुद्धा आहे.  स्वातंत्र्य म्हणजे काय? त्रासदायक वा बंधनकारक मर्यादांमुळे व्यक्तीच्या जीवनशैलीवर मर्यादा येऊ देता, तसेच त्यांच्या विचारस्वातंत्र्यावर गदा आणता व्यक्तीला बिनधास्त जगू देणे. काही वेळा नात्यांच्या वितंडवादामुळे व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर गदा आली किंवा राजकीय दबावामुळे पूर्ण पारतंत्र्यात जगावे लागले की, ’माणूसम्हणून किती मुस्कटदाबी होते हे कुणाला सांगायची गरज नाही. आपणस्वातंत्र्याची लढाईपाहिलीच आहे.

 

आपल्या आयुष्यात स्वातंत्र्य गमाविणे हा सगळ्यात दु:खदायक अनुभव असतो. कारण, यात एक व्यक्ती दुसऱ्या कोणासाठी तरी आपले स्वातंत्र्य सोडून देत असते. म्हणजेच आपली स्वत:ची ओळख, जिच्यामुळे आपण कोण आहोत, याची जाणीव व्यक्तीला होत असते, ती स्वातंत्र्याची जाणीवच गमावून बसण्यासारखी भयानक तडजोड व्यक्तीला आयुष्यात करावी लागणे, ही खूप दुर्दैवी गोष्ट आहे. कारण स्वत:ची स्वतंत्र इच्छाशक्ती ही एखादी अचानक विझवून टाकलेल्या ज्योतीसारखी विझते. तो आत्म्याचा प्रकाश विझतो आणि व्यक्ती आता स्वत:च्या विचारस्वातंत्र्याच्या, स्वत:च्या ऊर्जेच्या प्रकाशात जगूच शकत नाही. आता तिचे अस्तित्व हे दुसऱ्या कुणाच्या विचारांच्या, दृष्टिकोनांच्या भावनांच्या अधीन राहते. हा अस्तित्वाच्या पारतंत्र्याचा बदल खूप भीतीदायक असतो. त्याहीपेक्षा स्वत:च्या स्वतंत्र अस्तित्वाचा तात्त्विक विनाश विघातक आहे. व्यक्तिस्वातंत्र्य आपल्या आनंदासाठी आवश्यक आहे. कारण, माणसाचा आनंद हा त्याच्या स्वतंत्र इच्छाशक्तीवर, जागरुकतेने निर्णय घेण्यावर आणि मुक्त श्वासांनी व्यक्त करता येण्यावर अवलंबून असतो.

 

आज आपण बऱ्याचवेळा आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी करत असतो. आवडणाऱ्या व्यक्तींबरोबर जगत असतो. ऐहिक भोगासाठी नैतिकतेचा बळी देत असतो. खऱ्या अर्थाने आपल्या अंतर्मनाला पटणाऱ्या गोष्टी बाह्य जगामध्ये घडत असतात. म्हणून ऐहिक दबावाला बळी पडत, त्या गोष्टी करणारी व्यक्ती स्वत:च्या आत्म्याचे निरामय स्वातंत्र्य गमावत असते. खरे तर आज ज्या पद्धतीने लोकं दुसऱ्या लोकांचे स्वातंत्र्य बळकावताना आपण पाहतो, मग तो चंगळवाद असो, जातीयवाद असो की गरीब-श्रीमंतीचा भेद असो, ज्याच्याकडे कुठल्याही प्रकारची शक्ती वा अधिकार अधिक असतो, तो दुसऱ्या ला काबूत ठेवण्याचा सातत्याने प्रयत्न करतो. आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी आपण बदलायला हव्यात. पण, हे बदल घडविताना एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीचे वैयक्तिक स्वातंत्र्य बरखास्त होत नाही ना, किंबहुना आपण ते दुसऱ्या कडून हिरावून घेत नाही ना, हे सद्सद्विवेकबुद्धीने पाहिले तर जगात कुणावर अन्याय होणार नाही. अर्थात, मानवतेच्या दृष्टिकोनातून जग केव्हा बदलेल, ते सांगता येत नाही. पण, आपले स्वत:चे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी वैयक्तिक पातळीवर स्वत:ची स्वतंत्र विचारशक्ती आणि मते दृष्टिकोन निर्भेळ निरामय राहण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत. आपल्याला कुणी धमक्या दिल्या, टीका केली, विचारस्वातंत्र्यावर बंधने आणली, तरी ती आपण स्वीकारूच नये. अगदी आपल्या जीवलगांकडूनसुद्धा स्वीकारू नये. ज्यांना खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याचे महत्त्व कळते, ज्यांनास्वातंत्र्यया संकल्पनेबद्दल जिव्हाळा वाटतो, त्या व्यक्ती दुसऱ्या च्या स्वातंत्र्याचाही सन्मान करतात. तसे केले तरच जग खऱ्या अर्थाने आनंदी होईल.

 

- डॉ. शुभांगी पारकर

@@AUTHORINFO_V1@@