स्‍वातंत्र्य दिनी वांद्र्यात १५० फुट उंच तिरंग्‍याचे ध्‍वजवदंन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Aug-2018
Total Views |



मुंबई :स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत सकाळी वांद्रे पश्चिम येथील १५० उंच तिरंग्‍याचे ध्‍वजवंदन मान्‍यवरांच्‍या उपस्थितीत करण्यात त येणार आहे. तसेच या परिसरात उभारण्यात त आलेल्‍या फिटनेस पार्कचे लोकार्पणही करण्यात येणार आहे.

 

मुंबई भाजप अध्‍यक्ष आ. अॅड आशिष शेलार यांच्‍या संकल्‍पनेतून ओएनजीसीच्‍या सहकार्याने वांद्रे पश्चिम प्रोमोनाड येथे फिटनेस पार्क उभारण्यात त आले आहे. आरोग्‍यासाठी जॉगिंग करण्यात साठी,फिरण्यात साठी हा परिसर खास झाडांची रचना करून आरोग्‍यदायी करण्यात त आला आहे. तर याच परिसरात यापूर्वी योगा पार्कही उभारण्यात त आले आहे. दि. १५ ऑगस्‍ट रोजी सकाळी साडेआठ वाजता सिने अभिनेते ऋषी कपूर यांच्‍या हस्‍ते तर उद्योजक गौतम सिंघानिया यांच्‍यासह खा. पूनम महाजन, आ. अॅड आशिष शेलार व नगरसेविका अलका केरकर, सपना म्‍हात्रे, हेतल गाला यांच्‍या उपस्थितीत ध्‍वजवंदन करण्यात येणार आहे. त्‍यानंतर फिटनेस पार्कचे लोकार्पण करण्यात त येणार आहे. दरम्यान, या कार्यक्रमात स्‍थानिकांनीही मोठ्या प्रमाणात सहभागी व्‍हावे, असे आवाहन मुंबई भाजपचे सचिव अजित मण्याल यांनी केले आहे.

@@AUTHORINFO_V1@@