रोहिंग्यांचा प्रश्न हा राष्ट्रीय अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने हाताळला गेला पाहिजे : प्रदीप रावत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Aug-2018
Total Views |

पुणे : रविवार दि. १२ ऑगस्ट रोजी पुणे येथील स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्राच्या वतीने अध्यासन केंद्राच्या सभागृहात सामाजिक कार्यकर्ते व विविध विषयाचे अभ्यासक अक्षय जोग लिखित “Why Rohingya should be deported?” या पुस्तिकेचा प्रकाशन समारंभ माजी खासदार व नॅशनल शिपिंग बोर्डाचे अध्यक्ष प्रदीपदादा रावत यांच्या हस्ते संपन्न झाला.


या प्रसंगी प्रदीप रावत म्हणाले, “रोहिंग्यांचा प्रश्न हा राष्ट्रीय अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने हाताळला गेला पाहिजे. रोहिंग्याना आश्रय देवून आपण एका गंभीर संकटाचे रोपण तर करीत नाही ना? असा प्रश्न त्यांनी या वेळी उपस्थित केला. पुढे ते म्हणाले कि, ‘ज्याप्रमाणे अरबांना तुमच्या देशातील ज्यू कोठे आहेत? असा प्रश्न विचारला जातो, त्याचप्रमाणे आपण पाकिस्तान व बांगलादेशला तुमच्या देशातील हिंदू कोठे आहेत? असा प्रश्न विचारण्याची वेळ आलेली आहे. तसेच कुठल्याही इस्लामिक देशातून निर्वासित होणारे लोक हे गैर-इस्लामिक राष्ट्रातच आश्रय का शोधतात. त्यांना इतर कोणतेही इस्लामिक राष्ट्र आश्रय का देत नाही? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. सदर पुस्तिकेचे लेखक अक्षय जोग या प्रसंगी आपले मनोगत मांडताना म्हणले, ‘राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य देवून अनेक देशांनी त्यांच्या देशातील निर्वासितांना त्यांच्या मूळ देशात पाठवलेले आहे. राष्ट्राची सुरक्षा धोक्यात टाकून केवळ मानवतेच्या मुद्द्यावर कुठलेही राष्ट्र निर्वासितांना सामावून घेत नाही’. केंद्र शासनाच्या ‘इंसानियत’ या योजनेचा उल्लेख करून ते म्हणाले कि, ‘या योजनेच्या अंतर्गत रोहिंग्या निर्वासितांना परत पाठवल्यानंतर भारत सरकार त्यांना त्यांच्या देशात अन्न, वस्त्र, निवारा अशा पायाभूत सुविधांबरोबरच रोजगारही उपलब्ध करून देणार आहे. त्यासाठी प्रथमच भारत सरकारने म्यानमार सरकार सोबत अशा प्रकारचा करार केल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सावरकर अध्यासन केंद्राचे कार्यवाह महेश पोहनेरकर यांनी केले, तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अध्यासन केंद्राचे कार्यकर्ते भरत आमदापुरे यांनी केले.
 
 
@@AUTHORINFO_V1@@