तापी मेगा रिचार्ज योजनेच्या लिडारसर्व्हेक्षणास 13 पासून सुरूवात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Aug-2018
Total Views |
 
 
 

तापी मेगा रिचार्ज योजनेच्या लिडार सर्वेक्षण 13 पासून सुरूवात

  
जळगाव, 12 ऑगस्ट
सातपूडा पर्वतरांगाच्या पायथ्याशी असलेल्या परिसरास वरदान ठरणा-या तापी मेगा रिचार्ज योजनेच्या लिडार सव्र्हेक्षणास आज 13 ऑगस्ट पासून सुरुवात होत असून 18 ऑगस्ट पर्यंत हे  सर्व्हेक्षण होणार आहे.
 
ब-हाणपूर , रावेर, यावल , चोपडा या सातपुडयाच्या पायथ्याशी असलेल्या तालुक्यांमधील जमीनीच्या पायथ्याशी निसर्गाने बझाड (भुगर्भातील पोकळी) दिलेली आहे. त्यामध्ये खुप मोठया प्रमाणात पाणी जीरणे व सातपुडयाच्या पायथ्यापासून ते तापी नदीपर्यंतच्या सर्व भागातील भूगर्भामध्ये पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होण्यासाठी हे प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. हा प्रदेश केळी पिकवणारा असल्याने भूगर्भातील पाण्याचा उपसा मोठया प्रमाणात होतो. त्यामुळे भूजल पातळी 500 ते 700 फुट खाली गेलेली आहे. मेगा रिचार्ज योजनेमुळे भूजल पातळी 100 फुटांपर्यत येण्याची शक्यता आहे.
 
सातपुडयाच्या रांगेतुन मध्यप्रदेशातील आशिरगड पासून तापी नदीचे पाणी कालव्याव्दारे वळवून रावेर , यावल, चोपडा तालुक्यातील नदी – नाल्यातुन उतरुन मेगा रिचार्ज होवू शकणार आहे. याबाबतची पाहणी आ. हरिभाऊ जावळे यांनी रविवार 12 रोजी दुपारी केली. यावेळी त्यांच्या सेाबत व्ही.डी.पाटील,के.बी.पाटील व पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 13 ते 18 ऑगस्ट पर्यंत हे सर्व्हेक्षण होणार असून अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससह जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. फ्लॅड कॅनलसंदर्भात आ.जावळे यांनी ते खासदार असतांना केंद्रिय जल आयोगाकडे पाठपुरावा केला होता.
 
6 हजार कोटी रुपयांचा प्रकल्प
ब-हाणपूर (खारियागोटी तापी नदीवर धरण बांधणे)-रावेर-यावल-चोपडा (अनेर नदी पर्यंत कालवा)
मध्यप्रदेशातील खारियागोटी या ठिकाणी तापी नदीवर धरण बांधून त्यातील पुराचे वाहून जाणारे पाणी पावसाळयात ब-हाणपूर, यावल, चोपडा व रावेर या तालुक्यात कालव्याच्या माध्यमातुन सर्व नदी-नाल्यांमध्ये पुनर्भरण विहिरी करुन पाणी जीरवण्यात येणार .
 
@@AUTHORINFO_V1@@