सिडकोच्या सोडत योजनेस प्रारंभ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Aug-2018
Total Views |



नवी मुंबई : ‘सर्वांसाठी घरया योजनेअंतर्गत सिडकोतर्फे १४ हजार ८३८ घरे बांधण्यात येणार आहेत. सर्वसामान्यांना परवडतील अशी घरे सिडको साकारणार असून त्यांची ऑनलाईन सोडत काढण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी सोडत योजनेचा शुभारंभ केला जाणार आहे. सिडको गृहनिर्माण योजनेअंतर्गत कळंबोली, तळोजा, खारघर, घणसोली आणि द्रोणागिरी या पाच ठिकाणी असलेल्या ११ नोडमध्ये ही घरे उभारली जात आहेत. ही सर्व घरे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्पउत्पन्न गटातील लोकांसाठी असून प्रधानमंत्री आवास योजना आणि सी.एल.एस.एस. योजनेंतर्गत समाविष्ट आहेत. या महागृहनिर्माण योजनेची संगणकीय सोडत ऑक्टोबर रोजी करण्यात येणार आहे.

 

या योजनेत एकूण १४ हजार ८३८ घरांपैकी पाच हजार २६२ सदनिका आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांसाठी आहेत, तर हजार ५७६ सदनिका अल्प उत्पन्न घटकातील नागरिकांसाठी आहेत. यात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी २५ .८१ चौरस मीटर तर, अल्प उत्पन्न गटांसाठी २९ .८२ चौरस मीटर अशी विभागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या गृहसंकुलांना शास्त्रीय संगीतातील रागांची नावे देण्यात आली आहेत. ही योजना सिडकोच्या संकेतस्थळावर दि. १३ ऑगस्टपासून सुरू होणार असून प्रत्यक्षात अर्ज नोंदणीची कार्यवाही १५ ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजल्यापासून सुरू होणार आहे. नोंदणीकृत अर्जदार या योजनेत दि. १६ सप्टेंबरपर्यंत अर्ज दाखल करू शकतात. सिडकोच्या https://lottery.cidcoindia.com या संकेतस्थळावर योजनेच्या प्रक्रियेची माहिती देण्यात आली आहे. तसेच ज्या अर्जदारांना प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत अर्ज करायचा आहे, त्यांनी प्रधानमंत्री आवास योजना पोर्टल किंवा स्थानिक स्वराज्य संस्था पोर्टलवर, जसे नवी मुंबई महानगरपालिका, पनवेल महापालिका किंवा म्हाडा यांच्यापैकी कोणत्याही एका वेबपोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे.

@@AUTHORINFO_V1@@