‘स्वच्छ भारत ग्रामीण मिशन’च्या रथयात्रेचा समारोप

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Aug-2018
Total Views |



मुरबाड: स्वच्छता राखणे ही प्रत्येक ग्रामस्थाची जबाबदारी आहे. केवळ सरकारी मोहिमांची वाट पाहता प्रत्येक आबालवृद्धाने स्वच्छतेचा वसा घ्यावा. त्यातून ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागाची स्वच्छ जिल्हा अशी ओळख निर्माण होईलअसा विश्वास जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी आज येथे व्यक्त केला.
 

जिल्हा परिषदेच्या वतीनेस्वच्छ भारत ग्रामीण मिशनच्या जनजागृतीसाठी रथ तयार करण्यात आला होता. या रथाच्या माध्यमातून जिल्ह्याच्या कानाकोपर्यात स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. मुरबाड तालुक्यातील आंबेळे शाळेत रविवारी रथयात्रेचा समारोप झाला. जिल्ह्यात स्वच्छतेबाबत झालेल्या जनजागृतीबद्दल उपाध्यक्ष पवार यांनी समाधान व्यक्त केले. “अनेक आजारांचे मूळ हे स्वच्छता आहे, त्यामुळे प्रत्येक ग्रामस्थाने स्वच्छतेवर भर द्यायला हवा. काही जणांना कोठेही कचरा फेकण्याची सवय असते. ती मोडण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीने वेळीच कचरा उचलून त्याची योग्य विल्हेवाट लावावी. त्यामुळे अनेक आजारांपासून ग्रामस्थ दूर राहतील,” असा विश्वास उपाध्यक्ष पवार यांनी व्यक्त केला. “प्रत्येक गावाने स्वच्छतेचा वसा घेतल्यास ठाणे जिल्ह्याची वेगळी ओळख निर्माण होईल,” अशी खात्री सुभाष पवार यांनी व्यक्त केली.

@@AUTHORINFO_V1@@