१२ वर्षांखालील मुलीवरील बलात्कार्‍याला फाशीच!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Aug-2018
Total Views |




नवी दिल्ली : राष्ट्रपती डॉ. रामनाथ कोविंद यांनी फौजदारी नियम दुरुस्ती कायद्यावर स्वाक्षरी केली. यामुळे १२ वर्षांखालील मुलीवर बलात्कार करण्यात दोषी आढळून येणार्याला आता केवळ फाशीचीच शिक्षा ठोठावण्यात येणार आहे.

केंद्र सरकारने यावर्षीच्या दि.२१ एप्रिल रोजी फौजदारी कायदा दुरुस्ती अध्यादेश जारी केला होता. त्याची जागा हा कायदा घेणार आहे. जम्मू-काश्मीरच्या कठुआ आणि उत्तर प्रदेशच्या उन्नाव येथील बलात्काराच्या घटनेनंतर केंद्राने हा अध्यादेश आणला होता. राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनिशी हा कायदा अध्यादेश काढल्याच्या तारखेपासून अर्थात २१ एप्रिलपासूनच अमलात येणार आहे. त्यानंतर हा कायदा मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठविण्यात आला होता. त्यावर राष्ट्रपतींनी शनिवारी स्वाक्षरी केली, अशी माहिती सूत्रांनी दिली.

या नव्या कायद्यानुसार, १२ वर्षांखालील मुलीवर बलात्काराच्या घटनेत दोषी आढळणार्या व्यक्तीला फाशीची शिक्षा, तसेच १६ वर्षांखालील मुलीवर बलात्कार हत्या करणार्याला फाशी किंवा मरेपर्यंत जन्मठेप, सामूहिक बलात्काराच्या घटनेत मरेपर्यंत जन्मठेप किंवा फाशी आणि महिलांवरील बलात्काराच्या प्रकरणात असलेली सात वर्षांची शिक्षा आता १० वर्षांपर्यंत वाढविण्यात आली आहे. गुन्ह्याचे स्वरूप लक्षात घेऊन ही शिक्षा जन्मठेपेपर्यंत वाढविण्याची तरतूद यात आहे.

@@AUTHORINFO_V1@@