‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर तत्पररुग्णसेवेसाठी ‘संपर्क फाउंडेशन’चा श्रीगणेशाना. गिरीश महाजन यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Aug-2018
Total Views |

 
 

‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर तत्पर
रुग्णसेवेसाठी ‘संपर्क फाउंडेशन’चा श्रीगणेशा
ना. गिरीश महाजन यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती
 

जळगांव, ११ ऑगस्ट : ‘ना नफा ना तोटा’ या संकल्पनेवर संपर्क फाउंडेशन जळगाव शहरात गरजू रुग्णांना नर्सिंग सुविधा पुरवत आहे. रुग्णसेवेसाठी फाउंडेशनच्या माध्यमातून होणारे काम महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन जलसंपदा तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी फाउंडेशनच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षीय भाषणात केले.
 
नेहरू चौक परिसरात शनिवारी सायंकाळी हा सोहळा झाला. प्रमुख पाहुणे खा. ए.टी.नाना पाटील, आ. सुरेश भोळे, आ.चंदूभाई पटेल, जिल्हाधिकारी किशोराजे निंबाळकर, माजी महापौर ललित कोल्हे, रा.स्व. संघाचे देवगीरी प्रांत प्रचार सह प्रमुख स्वानंद झारे तसेच माजी नगरसेवक कैलास सोनवणे, मनोज काळे, चंद्रकांत कापसे, अतुलसिंह हाडा आदी मंचावर होते.
 
 
प्रास्ताविक पुरुषोत्तम न्याती यांनी केले. संपर्क फाउंडेशन ही संस्था भारत विकास परिषदेशी संल्लग्न आहे. भारत-चीन युध्दाच्या वेळी भारत विकास परिषदेची स्थापना करण्यात आली. या परिषदेच्या देशात १ लाखापेक्षा अधिक शाखा आहेत.
रुग्णांची रुग्णालयातून सुटी झाल्यानंतर घरी त्याला योग्यपध्दतीने उपचार देणे, त्याची काळजी घेणे यासाठी प्रशिक्षित सेवकांची आवशकता असते. नवजात शिशू, वृध्द, मनोरुग्ण अशा रुग्णांवर आणि जखमी रुग्णांची मलमपट्टी करण्यासाठी कुशल, अर्धकुशल सेवक, मावशी, आया यांची गरज भासत असते. पण गरजेनुसार योग्य नर्सिंग उपलब्ध होत नाही. जे उपलब्ध होत असतात त्यांचे शुल्क अधिक असते. रुग्णाच्या परिवाराची ही समस्या लक्षात घेवून संपर्क फाउंडेशनने ‘ना नफा ना तोटा’ तत्वावर अशा गरजू रुग्णांसाठी नर्सिंग सुविधा उपलब्ध करुन देण्याचा हा उपक्रम आहे.
 
 
यासोबत रुग्णवाहिका, रक्त, लघवी आदींचे नमुने घेणे, मलमपट्टी, फिजिओथेरपी आदी सेवांसाठीही सहाय्य केले जाणार आहे, असेही पुरुषोत्तम न्याती यांनी संगीताले .
 
आ.सुरेश भोळे यांनी समयोचित मनोगतामध्ये सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून संपर्क फाउंडेशन कार्य करीत असल्याचे कौतुक करुन शुभेच्छा दिल्या.
 
जिल्हाधिकारी निंबाळकर यांनी मनोगतात ना.गिरिश महाजन हे आरोग्यदूत म्हणून प्रसिध्द आहेत. रुग्णसेवेत खारीचा वाटा म्हणून संपर्क फाउंडेशन उपक्रम राबवित आहे. एकाकी आई-वडिलांच्या, आप्तांच्या सेवेसाठी हे फाउंडेशन उपयुक्त ठरेल. ‘चांगली सेवा हिच ईश्‍वर सेवा’ हे ब्रीदवाक्य फाउंडेशनने घ्यावे, अशी सूचनाही त्यांनी केली.
 
 
ना.महाजन अध्यक्षीय भाषणात म्हणाले की वैद्यकीय क्षेत्रात आपण २५ वर्षांपासून कार्यरत आहोत. ग्रामीण भागातील रुग्णांना तज्ञ डॉक्टरांकडे नेत योग्य उपचार करण्याचे कार्य केले जात आहे. त्यामुळे संपर्क फाउंडेशनच्या माध्यमातून केले जाणारे कार्य महत्वाचे आहे. संघाच्या माध्यमातून रुग्णसेवेचे कार्य व्यवस्थित सुरु आहे. अनेक लोक स्वत:ची सुश्रुषा करु शकत नाही. त्यामुळे अशा सेवेची गरज वाढत असल्याने संपर्क फाउंडेशनला अधिक कर्मचारी व सहकार्‍यांची गरज भविष्यात भासणार आहे. ज्या गरजू रुग्णांना अशा सेवांची गरज आहे, अशा रुग्णांची माहिती जी.एम.फाउंडेशनकडे द्यावी.मुख्यमंत्री निधी तसेच विविध योजनांद्वारे गरजू रुग्णांसाठी निधी उभारला जाईल, अशी ग्वाहीही ना. महाजन यांनी दिली. मान्यवरांच्या हस्ते माहिती पत्रकाचे प्रकाशन झाले.
 
 
सूत्रसंचालन पुरुषोत्तम न्याती आणि आभारप्रदर्शन डॉ. स्नेहल फेगडे यांनी केले.गरजूंनी ७५८८४७८६२४ वर संपर्क साधावा, असे आवाहन फाउंडेशनच्यावतीने करण्यात आले.
 
रुग्णसेवेसाठी संपर्क फाउंडेशनचे १३ कर्मचारी व १९ सहकारी ऑन कॉल सेवेसाठी उपलब्ध आहे.
 
या मान्यवरांची होती उपस्थिती
रवींद्र लढ्ढा, तुषार तोतला, ललित मुथा, डॉ.अमित चौधरी, चेतना नन्नवरे आदी मान्यवर उपस्थित होते.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@