शिवप्रतिमा आणि चिह्नसंकेत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Aug-2018   
Total Views |

 

महादेव अर्थात शिव यांना अनेक नावांनी संबोधित केले जाते. ‘त्र्यंबकहे त्यापैकीच एक नाव. ‘त्र्यंबकम्हणजे तीन डोळे असलेली देवता. सूर्य हा शिवाचा उजवा डोळा आहे, तर चंद्र हा त्याचा डावा डोळा आहे. सर्वसाक्षी शिवाची भौतिक जगातली उपस्थिती सर्वत्र आहे, असा चिह्नसंकेत हे सूर्य-चंद्राचे दोन डोळे देत असतात.
 

महादेव अर्थात शिव यांच्या शिल्प, मूर्ती, चित्र आणि प्रतिमा हे सर्व विलक्षण असून प्राचीन भारतीय चिह्न आणि चिह्नसंकेतांचे गौरव स्थान आहे. काही सहस्त्र वर्षांपूर्वी सगुण-साकार झालेलीशिवदेवताही लिखित संकल्पना, त्याच्या व्यष्टी आणि अंगभूत दैवी गुणधर्म याचे शिल्पलिपीत अथवा चित्रलिपीत केलेले भाषांतर हे खूप प्रगत तंत्रज्ञान होते आणि आज त्याचा उपासकांवरील प्रभाव कालातीत आहे. महादेव अर्थात शिव यांना अनेक नावांनी संबोधित केले जाते. ‘त्र्यंबकहे त्यापैकीच एक नाव. ‘त्र्यंबकम्हणजे तीन डोळे असलेली देवता. सूर्य हा शिवाचा उजवा डोळा आहे, तर चंद्र हा त्याचा डावा डोळा आहे. सर्वसाक्षी शिवाची भौतिक जगातली उपस्थिती सर्वत्र आहे, असा चिह्नसंकेत हे सूर्य-चंद्राचे दोन डोळे देत असतात. शिवाचा तिसरा डोळा अग्नीचा आहे. त्याचे अलौकिक ज्ञान, बुद्धिमत्ता आणि त्याची विश्वावरील सार्वभौम सत्ता याचा हा डोळा प्रतिक आहे.

 

 
 
 
 आपल्या मेंदूच्या दोन भागांमध्ये मागच्या बाजूला pinelglandम्हणजे शंकूच्या आकाराची पिनिअल ग्रंथी असते. खरे सांगायचे तर आजही, या ग्रंथीचे मानवी शरीरातील निश्चित काम काय आहे, त्याचा निष्कर्ष संशोधक काढू शकलेले नाहीत. शिवाच्या या तिसऱ्या डोळ्यासंदर्भात,११४ वर्षांपूर्वी, एका नामवंत अमेरिकन वैद्यकशास्त्रज्ञाने शरीरशास्त्राचा विज्ञाननिष्ठ अभ्यास केला, त्याचे नावडॉ. जे. डी बक.’ The Robert Clarke Company, Cincinnati, US-णड-यांच्यातर्फे १९०४ साली प्रकाशित झालेल्या त्यांच्या Mystic Mesonry' या पुस्तकात, अध्यात्म आणि शरीरविज्ञानशास्त्राचे गाढे अभ्यासक असलेले डॉ. बक लिहितात की, “सामान्य माणसाच्या मस्तकातील ही ग्रंथी फार काही उपयोगाची नसते.” ऋग्वेद आणि उपनिषदातील ऋचांचा संदर्भ देऊन डॉ. बक पुढे लिहितात, “शिवाचा तिसरा डोळा म्हणजे अवकाश आणि काळ (space and time) या दोन भौतिक आणि वास्तव संकल्पना भेदून जाणारी विश्वनिर्मात्याची ही खूप प्रगत झालेली पिनिअल ग्रंथी आणि तिची अलौकिक, अपरिमित, अगणित शक्ती असेच म्हणायला हवे.” शिवाच्या या तिसऱ्या डोळ्याला, डॉ. बक यांनी Clairvoyance म्हणजे अलौकिक-अतींद्रिय दृष्टी आणि Clairaudience म्हणजे असामान्य अतींद्रिय श्रवण शक्ती अशा शब्दांत गौरविले आहे.  त्यांच्या मताने शिवाच्या गळ्यातली मानवी कवट्यांचा हार आणि त्यातील कवट्या हा विशेष चिह्नसंकेत आहे. कारण, मानवी कवटी सर्व इंद्रियांचे घर आहे. निदान तीन हजार वर्षांपूर्वी शिवाच्या तिसऱ्या डोळ्याची ही संकल्पना मांडणारे वेद साहित्याचे निर्माते शरीरशास्त्र संदर्भात किती प्रगत असावे त्याचे हे निश्चित उदाहरण. शिवाच्या प्रतिमेमध्ये त्याचे दोन नेत्र नेहमी अर्धोन्मीलित अशा योगसाधना मुद्रेमध्ये असतात. आदियोगी शिव हे योगशास्त्राचे निर्माते आहेत आणि सर्वश्रेष्ठ नर्तक-अभिनेतेही आहेत. आपल्या अर्धोन्मीलित नेत्र मुद्रेतून ते सामान्य सजीवाला काही संकेत देत असतात. योगमुद्रेतील असे अर्धोन्मीलित नेत्र जेव्हा पूर्ण उघडतात, तेव्हा विश्वनिर्मितीचे एक आवर्तन सुरू होते. शिवजी जेव्हा आपले डोळे पूर्ण मिटून घेतात, तेव्हा लय तत्त्वातील सृष्टीची विघटन-विसर्जन प्रक्रिया सुरू होते. निसर्गचक्राच्या सतत आणि अव्याहत आवर्तनाचे असे विलक्षण संकेत शिवाच्या अर्धोन्मीलित नेत्रांच्या मौखिक मुद्रेतून दर्शन देत असतातशिवाच्या कानातली अलंकार, त्याची कुंडले याचे चिह्नसंकेत असेच तर्कसंगत आहेत. शिवाच्या उजव्या कानातील पुरुषाच्या कुंडलांनाअलक्ष्यअसे संबोधन आहे. या शब्दाचा अर्थ कुठल्याही भौतिक मुद्रा अथवा चिह्नाने सगुण-साकार करता येणार नाही असे अलौकिक क्षमतेचेदैवी कुंडल.’ शिवाच्या डाव्या कानातील स्त्रीच्या कुंडलांचे संबोधन आहे, ‘निरंजन.’ सामान्यदृष्टीला दिसू शकत नाही अशी याचीपारलौकिक क्षमता.’ शिव आणि प्रकृती यांचा एकाच शरीरमुद्रेतीलयुगुलधर्म याचे संकेत देणारी ही दोन कुंडले. शिवाच्या गळ्यावर तीन वेढे घातलेला, शिवाच्या उजवीकडे पाहाणारावासुकी नागहा त्याचा एक सजीव अलंकार. बहुविध चिह्नसंकेतांचे फार प्रगत कौशल्य असलेली ही मांडणी. हा वासुकी नाग जहरी आहे आणि त्याला प्रतिकशास्त्रात अनेक संकेतमूल्य दिली गेली. शिवाच्या गळ्यावरील हा नाग, पंचमहाभूतातील पृथ्वी या तत्त्वाचे प्रतिक आहे. याच नागाला सूर्याचे प्रतीकही मानले गेले. अनेक मध्ययुगीन भारतीय क्षत्रियकुलीन सूर्योपासक राज्यकर्त्यांच्या ध्वजावर असा नाग उगवत्या सूर्याचे प्रतिक म्हणून शीर्षस्थानी अंकित झालेला दिसतो. एका बाजूला जहरी नाग म्हणजे दुष्ट-संहारक-विषय भावनांचे प्रतिक आहे. दुसऱ्या बाजूला आपली शेपटी स्वतःच्या तोंडात धरलेला हाच नाग, सर्व वासनांवरील सामान्य सजीवाच्या मनातील त्याच्या संयमाचे प्रतिक आहे.
 
 

 
 

साधू-वैराग्याप्रमाणेच हा नाग कुठेही घर बांधत नाही, रानावनात कुठल्याही परिस्थितीत एकटा राहतो म्हणून हा नाग वैराग्याचेही प्रतिक आहे. शिवाच्या गळ्यावर तीन वेढे देणारा हा नाग, या आदियोग्याच्या योगसाधनेतून स्वत:चे मन आणि शरीर यावरचे संपूर्ण नियंत्रण असण्याचे संकेत देतो आणि सामान्य दर्शकाला, असे नियंत्रण आत्मसात करण्याचे मार्गदर्शन करतो. नागाचे मानेवरील तीन वेढे सजीवाच्या भूत, वर्तमान आणि भविष्य अशा तिन्ही काळांचे अस्तित्व आणि आवर्तन सूचित करतात. शिवाच्या प्रतिमेतील त्याचे उजवे शरीर, बुद्धिमत्ता, विवेक, तर्कनिष्ठता, न्याय अशा मूल्यांचे नियंत्रण करते आणि विश्वाचा निर्माता शिवाच्या तर्कसंगत, विवेकी आणि न्याय्य वैश्विक व्यवहाराचे संकेत देते. ‘रुद्रहे शिवाचे दुसरे नाव आहे. ‘रुद्रहा शिस्तप्रिय आणि उग्र मुद्रेचा आहे. अक्ष म्हणजे डोळा. विश्वनिर्मितीच्या वेळी शिवाने १०८ मूलतत्त्वांचा वापर केला होता. अशा १०८ रुद्राक्षांची माला हा शिवाचा एक निर्जीव सांकेतिक अलंकार आहे. या विश्वाचा व्यवहार कडक शिस्तीने आणि नि:पक्ष, तटस्थ न्यायाने केला जाईल, या संकल्पनेचे हे रुद्राक्षमालेचे प्रतिक आहे. शिवाचेत्रिशूळएक वैशिष्ट्यपूर्ण आयुध आहे. त्रिशूळ म्हणजे तीन पाती असलेले आयुध, जे शिवाच्या तीन शक्तींचे प्रतिक आहे. इच्छा, क्रिया, ज्ञान अशा तीन शक्ती या आदियोध्याचा परिचय सांगतात. दुर्जन आणि हिंसक विचार याचा नाश करण्याची इच्छा, त्यासाठी आवश्यक शक्ती आणि प्रत्यक्ष क्रिया असा हा तिहेरी दमन सामर्थ्य क्षमतेचा विचार. दर्शक आणि उपासक यांनी याचा योग्य अभ्यास करूनच हे आत्मसात करावे. ‘डमरूहा शिवाचा फारच विलक्षण अलंकार आहे, हे त्याचे मूळ अंगभूत वैशिष्ट्य नव्हे. डमरू हे अगदी प्राथमिक नाद निर्माण करणारे चर्मवाद्य आहे. एका निमुळत्या गळ्याने बांधलेले दोन अर्धगोल असे याचे स्वरूप आहे. विश्वातील सजीवांच्या अस्तित्वाच्या अव्यक्त आणि प्रकट अशा दोन अवस्थांचे दोन अर्धगोलांचे हे विलक्षण प्रतिक आहे. त्या दोन्हीचे नाद वेगळे असले तरी एकत्र वाजवल्यावर त्याचा संपूर्ण नाद निर्माण झाला तो म्हणजे विश्वनिर्मितीच्या वेळी शिवाने केलेला ओंकारनाद, जन्म आणि मृत्यूच्या अव्याहत चक्राचे निर्देशक. शिवाच्या आसनाच्या बाजूला असलेलाकमंडलूदर्शकाला फार सखोल अध्यात्मिक तत्त्वज्ञान सांगतो. वरचे देठ कापून ताज्या भोपळ्याच्या आतील बी आणि गर काढून सुकवलेल्या भोपळ्यात मध भरलेला हा कमंडलू शिवाच्या सान्निध्यात असतो. हा भोपळा सामान्य सजीवाचे प्रतिक आहे. व्यक्तीच्या संस्कारशील वयातच मायावी जगातील बंधने तोडून, भोपळ्यातल्या बीज आणि गरासारखा आपला अहंकार समूळ नष्ट करा आणि त्यात मधासारखा ज्ञान संचय करा असा मार्गदर्शक सल्ला देणारा हा शिवाचा कमंडलू. शिवाच्या संयुक्त प्रतिमेतील सगळी आयुधे, सजीव प्राणी आणि निर्जीव वस्तू हे सगळे त्याच्या व्यष्टी आणि व्यक्तिमत्वाचा अविभाज्य भाग आहेत. यातील प्रत्येकाला स्वतःचे व्यक्तिमत्व आहेच. मात्र, शिवाने त्यांच्या शरीरावर धारण केल्यानंतर अथवा त्यांच्या सान्निध्य असल्यानंतर मिळणारे सर्व संकेत आणि संकेतमूल्ये वैश्विक दर्जाची आहेत.


@@AUTHORINFO_V1@@