महाविद्यालयात विद्यार्थ्यांना चारचाकी आणण्यास मज्जाव

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Aug-2018
Total Views |

दक्षता समितीचा नवीन निर्णय, विविध महाविद्यालयांतील प्राचार्यांचा सूर

जळगाव :
गेल्या आठवड्यात शहरातील प्रतिष्ठित मू. जे. महाविद्यालयात बाहेरील युवकाने बेकायदेशीररीत्या चारचाकी चालवित काही वाहनांना अंदाधुंदपणे उडवले होते. मात्र, यावेळी सुदैवाने काही जीवितहानी झाली नाही. ही घटना निषेधात्मक असून अशा घटना भविष्यात घडू नये, यासाठी महाविद्यालयातील दक्षता समितीतर्फे युवकांना चारचाकी आणण्यास मज्जाव करण्यात आला आहे, असा सूर मू. जे. महाविद्यालय, एस.एस.बाहेती, नूतन मराठा महाविद्यालयातील प्राचार्य यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना व्यक्त केला.
 
 
मू.जे. महाविद्यालयात विशेष दक्षता समिती
मू.जे.महाविद्यालयात घडलेला प्रकार चुकीचा होता. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात येताना दुचाकी वाहन आणण्यास काही हरकत नाही. मात्र, शहराचे अंतर कमी असल्याने विद्यार्थ्यांनी चारचाकी आणणे कितपत योग्य आहे. ही बाब बर्‍याचदा खटकते. बाहेरील विद्यार्थ्यांवर नियंत्रण ठेवता यावे, याकरिता महाविद्यालयाने संविधानिकरीत्या विशेष दक्षता समिती नेमली आहे. यात महाविद्यालयाचे ८ ते १० प्राध्यापक कार्यरत आहे. वर्षभर ही समिती कार्यरत असते. एका वर्षानंतर त्याचे नूतनीकरण होत असल्याची माहिती विशेष दक्षता समितीचे प्रमुख प्रा.जुगलकिशोर दुबे यांनी दिली.
 
 
विद्यार्थ्यांसोबत पालकांनीही नियमांचे पालन करावे
बाहेरील युवकांनी महाविद्यालयात बेकायदेशीरपणे प्रवेश करून संबंधित मालमत्तेचे नुकसान करणे ही निषेधात्मक बाब आहे. अशा मुलांना अटकाव करता यावा, यासाठी महाविद्यालयाच्या प्रवेशव्दारासमोरच गरजेनुसार सुरक्षारक्षक नेमले आहेत. तसेच प्रतिबंधात्मक सूचना फलक लावण्यात आले आहेत. भविष्यात अशा घटना घडू नये, यासाठी महाविद्यालयाच्या नियमांचे पालन विद्यार्थी आणि प्रसंगी पालकांनी त्यांच्या मनात रुजविणे गरजेचे आहे
- अनिल लोहार, प्राचार्य
एस.एस.बाहेती महाविद्यालय,जळगाव
 
 
महाविद्यालयाच्या आवारात विद्यार्थ्यांनी चारचाकी आणण्यास मज्जाव असल्याने त्यांना गेटवर अडवले जाते. यासाठी विशेष समिती नेमली आहे. संबंधित घडलेली घटना ही निंदनीय असून आपला पाल्य कोठे जातो, काय करतो, याचे भान पालकांना असले पाहिजे. महाविद्यालयात चारचाकी आणण्यासाठी केवळ शिक्षकांनाच परवानगी आहे. महाविद्यालय हे ज्ञान ग्रहण करण्यासाठी असते. स्टंटबाजी अथवा मिरविण्यासाठी नाही, याचे भान युवकांनी ठेवले पाहिजे. भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी संबंधित समिती अधिक दक्ष राहून जबाबदारी पार पाडेल.
- एल.पी.देशमुख, प्राचार्य
नूतन मराठा महाविद्यालय,जळगाव
 
@@AUTHORINFO_V1@@