राष्ट्रीय ओ.बी.सी.आयोगाला मिळाला घटनात्मक दर्जा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Aug-2018
Total Views |

शिष्टमंडळाने व्यक्त केले आभार

 
जळगाव, ११ ऑगस्ट :
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने राष्ट्रीय ओ.बी.सी. आयोगाला घटनात्मक दर्जा मिळवून दिल्याने केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या नेतृत्त्वाखालील एका शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेवून त्यांच्याप्रती आभार व्यक्त केले.
 
 
देशातील ओ.बी.सी. समाजाच्या उन्नतीसाठी राष्ट्रीय ओ.बी.सी. आयोग तयार करण्यात यावा अशी अनेक वर्षांपासून मागणी होत होती. त्या अनुषंगाने केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने राष्ट्रीय ओ.बी.सी.आयोगाला घटनात्मक दर्जा मिळवून दिला. त्यामुळे ओ.बी.सी. वर्गाचा विकास गतीने होवू शकेल. अनेक दशकांची ही मागणी मोदी सरकारने पूर्ण केल्याबद्दल केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या नेतृत्त्वात एका शिष्टमंडळाने पंतप्रधानांची भेट घेवून त्यांचे आभार मानले.
 
 
याप्रसंगी भा.ज.पा.ओ.बी.सी.मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी, खा. रामदास तडस, खा.कपिल जी. पाटील, ओ.बी.सी. मोर्चाचे महामंत्री संजय गाते, अजय भोळे, प्रतिभा चौधरी, कार्यसमिती सदस्य कमल ठाकूर, प्रा.सागर, मंदार विजय चौधरी आदी मान्यवर
उपस्थित होते.
@@AUTHORINFO_V1@@