महाराष्ट्रातील १० स्वातंत्र्यसैनिकांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Aug-2018
Total Views |
 
 
 
 
 
नवी दिल्ली :  ‘भारत छोडो’ आंदोलन, गोवा मुक्ती, हैद्राबाद मुक्ती आंदोलनात मोलाचे योगदान देणाऱ्या महाराष्ट्रातील १० स्वातंत्र्यसैनिकांचा राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते आज राष्ट्रपती भवन येथे सन्मान करण्यात आला. क्रांतिदिनाचे औचित्य साधून भारत छोडो आंदोलनाच्या ७६ व्या स्मृतिदिनानिमित्त राष्ट्रपती भवनात स्वातंत्र्यसैनिकांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
 
 
सन्मान झालेल्या स्वातंत्र्य सैनिकांमध्ये महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील कुपवाड येथील देवप्पा खोत, नागपूर जिल्ह्यातील गणपतराव गभणे, परभणी जिल्ह्यातील डॉ. अवधूत डावरे आणि वसंत अंबुरे, मुंबईतील गदाधर गाडगीळ आणि अनंत गुरव, पुणे जिल्ह्यातील बाळासाहेब जांभूळकर, अरविंद मनोलकर, वसंत प्रसादे तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील वसंतराव माने या स्वातंत्र्यसैनिकांचा समावेश आहे.
 
 
 
 
 
स्वातंत्र्यसैनिक देवाप्पा खोत हे सांगली जिल्ह्यातील कुपवाड येथील आहेत. सध्या 99 वर्षाचे आहेत. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात  खोत यांनी कुपवाड सेंटर (चावडी ) येथे झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये सहभाग घेतला होता. कुपवाड येथून जवळ असणारे माधवनगर येथे रेल्वेरुळ त्यांनी उद्धवस्त केले होते. तसेच तत्कालीन धुळे कोषागार कार्यालयालाही हानी पोहोचविली होती.
 
 
स्वातंत्र्यसैनिक गणपतराव गभणे, नागपूर जिल्ह्यातील आहेत सध्या ते सुमारे ८० वर्षांचे असून आजही त्यांच्या आवाजात दम आहे. गोवा मुक्ती आंदोलनात गभणे यांनी सक्रिय सहभाग नोंदविला होता. १५ ऑगस्ट १९५५ ला कॉम्रेड हेमंतकुमार बसू यांच्या नेतृत्वामध्ये दोडामार्गे आईखेडा येथून त्यांनी गोव्याच्या जंगलात जाऊन सत्याग्रह केला. पोर्तुगीज पोलिसांनी त्यांना खूप मारहाण केली होती. हैद्राबाद मुक्ती आंदोलनातही  गभणे त्यांनी हिरिरीने भाग घेतला होता.
 
 
 
 
 
स्वातंत्र्य सैनिक डॉ. अवधूतराव डावरे हे परभणी जिल्ह्यातील आहेत. डावरे यांनी १९३८ ते १९४८ पर्यंत झालेल्या विविध आंदोलनात भाग घेतला होता. १९४२ च्या ‘चले जाव’ आंदोलनात सत्याग्रहींना त्यांनी मार्गदर्शन केले तसेच परभणीमध्ये झालेल्या या आंदोलनाचे नियोजन केले. तत्कालीन इंग्रजी शाळा, महाविद्यालयामध्ये जनजागृती करून त्यांनी शाळा बंद पाडल्या. विदेशी वस्त्र आणि वस्तूंची होळी केली होती. झेंडा सत्याग्रहातही डावरे यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. शासकीय कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा कोषागार कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा कारागृहात पोलीस स्टेशनवर तिरंगा ध्वज फडकविला होता. त्यांनी २ वर्ष सक्तमजुरीची शिक्षा भोगली. हैद्राबाद मुक्ती संग्रामात त्यांनी लोणी कॅम्पमध्ये रझाकारांशी मुकाबला केला होता.
 
 
स्वातंत्र्य सैनिक वसंत अंबुरे हे परभणी जिल्ह्याचे आहेत. त्यांचे वडील चंद्रनाथ अंबुरे हे सक्रिय स्वातंत्र्यसैनिक होते. १९४७ मध्ये वसंत अंबुरे यांचे वडील परभणी आणि औरंगाबाद या तुरूंगात होते. त्यावेळी वसंत अंबुरे भूमिगत राहून स्वातंत्र्य संग्रामाचे कार्य पूर्ण केले. हैद्राबाद मुक्ती संग्रामातही वसंत अंबुरे यांनी सक्रिय सहभाग घेतला होता.
 
 
स्वातंत्र्यसैनिक गदाधर गाडगीळ मुंबई येथे स्थायिक असून सध्या ८८  वर्षांचे आहेत. गाडगीळ हे आपल्या काही मित्रांसोबत गोवा मुक्ती संग्रामामध्ये सहभागी झाले होते. १५  ऑगस्ट १९५४  ला ‘पोर्तुगीज चले जाव’ या नाऱ्याने सत्याग्रहाची सुरूवात केली. या संग्रामात गोळीबार झालेला होता. १९  सप्टेंबर १९४५  मध्ये त्यांना कैदही झालेली होती. 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@