पत्रकारांच्या मूलभूत मागण्यांसाठी नाशिकला पत्रकारांचे धरणे आंदोलन .

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Aug-2018
Total Views |


 
नाशिक : शहरी व ग्रामीण पत्रकारांच्या मूलभूत मागण्यांसाठी पत्रकार संरक्षण समितीच्या वतीने नाशिकच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर पत्रकारांनी(दि.९ ऑगष्ट २०१८ ऑगष्ट क्रांती दिन) तीव्र आंदोलन केले,आंदोलक पत्रकारांनी शासन व समाजाकडून होणाऱ्या विवंचनेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. जिल्हाधिकारी बी राधाकृष्णन,जिल्हा माहिती अधिकारी किरण मोघे यांना चर्चा करून निवेदन सादर केले. सकाळी ११.०० वाजता पत्रकार आंदोलकांनी नाशिकच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या प्रांगणाची स्वच्छता केली,त्यानंतर ११ ते दुपारी ३ दरम्यान या ठिकाणी गळ्यात आपल्या मागण्यांचे बोर्ड टांगून राज्य व केंद्र शासन व माहिती व प्रसारण विभागाविरोधात घोषणा दिल्या,आपल्या मागण्यांत यावेळी पत्रकार संरक्षणाचा मसुदा कुठे गेला,पत्रकारांची माहिती विभागात नोंदणी करावी,आधीस्वीकृती समिती बरखास्त करून आधिस्वीकृतीतील जाचक अटी शर्ती रद्द कराव्या,राज्यातील पत्रकार संघटनाना शासकीय समित्यांवर घ्यावे,पत्रकार पेंशन योजनेत ग्रामीण शहरी श्रमजीवी पत्रकारांना नाकारल्याने शासनाचा तीव्र निषेध केला.
 

यावेळी जिल्हाधिकारी बी राधाकृष्णन यांचेकडे पत्रकारांची शासन नोंद घेत नसल्याची तक्रार करण्यात आली,तसेच जिल्हा माहिती अधिकारी किरण मोघे यांना यावेळी पत्रकारांनी आपल्या विवंचनेबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले यावेळी पत्रकार संरक्षण समितीचे राज्य उपाध्यक्ष राम खुर्दळ,विभागीय अध्यक्ष दिलीप भाई सोनार,भारतीय मीडिया फाउंडेशन चे राजेंद्र वाघ,जिल्हाध्यक्ष प्रमोद राहणे,पुरोगामी पत्रकार संघटना राज्य उपाध्यक्ष शशिकांत पगारे,शहर अध्यक्ष प्रदीप जाधव,तालुकाध्यक्ष महेश गायकवाड,डॉ संदीप भानोसे,महाराष्ट्र पत्रकार महासंघाचे कुमार कडलंग,नरेंद्र पाटील,हेमंत काळमेख,पद्माकर देशपांडे,दीपक भावसार,राजेंद्र भांड,सुनील मगर,अमर ठोंबरे,प्रहारचे दत्तू बोडके,भास्कर पोटींदे,कचरू वैद्य,प्रा सोमनाथ मुठाळ,सतीश नांदोडे,सुभाष कांडेकर,भूपेंद्र बारू,दादाजी पगारे,आम आदमी चे प्रभाकर वायचले,केदारनाथ संस्थेचे सुदाम जाधव,लक्ष्मण सोनवणे,एकनाथ शिंदे,अनिल येवले,चंद्रकांत धात्रक,यासह पत्रकार उपस्थित होते.

@@AUTHORINFO_V1@@