बोदवड उपसा सिंचन योजनेसाठी ६६.६६ कोटीचा निधी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Aug-2018
Total Views |

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे विशेष प्रयत्न

 
 
जामनेर, ९ ऑगस्ट :
तापी पाटबंधारे विकास महामंडळ, जळगाव अंतर्गत बोदवड परिसर सिंचन योजनेस सन २०१८ च्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे रु.६६.६६ कोटी उपलब्ध करुन द्यावे अशी नियोजन व वित्त विभागास विनंती करण्यात आली होती. बोदवड परिसर सिंचन योजनेस केंद्र शासनाकडून रु.६६.६६ कोटी निधीचे वितरण सूत्राबाहेर ठेवण्यास राज्यपालांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या विशेष प्रयत्नास यश आले आहे. जलसंपदा मंत्री ना. महाजन यांनी मा. राज्यपालांची भेट घेऊन आभार व्यक्त केले.
 
 
बोदवड परिसर सिंचन योजनेत जुनोने व जामठी धरण बांधणे अंतर्भूत आहे. ही योजना पूर्ण झाल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील २६,७२१ हेक्टर व बुलढाणा जिल्ह्यातील १५,६९९ हेक्टर असे एकूण ४२,४२० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. यापैकी सुमारे २०,२०० हेक्टर प्रवाही पद्धतीने व २२,२२० हेक्टर उपसा पद्धतीने सिंचित होणार आहे.
 
 
बोदवड परिसर सिंचन योजनेस २ फेबु्रवारी १९९९ रोजी रु.५२२.२० कोटीला प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली होती आणि ४ सप्टेबर २००८ रोजी रु.१५०८.२३ कोटीला द्वितीय मान्यता प्राप्त झाली होती. बोदवड परिसर सिंचन योजनेस केंद्रीय जलआयोगाची मान्यता प्राप्त असून येाजनेस रु.२,१७८.६७ कोटी एवढया रक्कमेस नियेाजन आयोगाची देखील मान्यता आहे. सदर योजनेचे काम तातडीने व विहीत कालावधीत पूर्ण होण्यासाठी केंद्रीय सहाय्य मिळण्यासाठी राज्य शासनाने सादर केलेल्या प्रस्तावाचा केंद्रीय मंत्रीमंडळात विचार होऊन केंद्र शासनाने एकरकमी रु.५०० कोटी मंजूर केलेले असून त्यानुसार सन २०१३-१४ व सन २०१४-१५ साठी अनुक्रमे रु.१२.४० कोटी व रु.२०० कोटी अशी तरतूद केंद्र शासनाच्या अर्थसंकल्पात केलेली होती. केंद्र शासनाने १९ नोव्हेबर २०१४ च्या पत्रानुसार बोदवड परिसर सिंचन योजनेसाठी या तरतुदींपैकी रु.६६.६६ कोटी केंद्र शासनाने महाराष्ट्र राज्य सरकारला प्रकल्पासाठी मदत म्हणून वितरीत केलेले आहेत.बोदवड परिसर सिंचन योजनेबाबत राज्य मंत्रीमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार या योजनेच्या टप्पा-१ चे काम सुरु करण्यास परवानगी दिलेली आहे. त्यानुसार टप्पा-१ मधील जुनोने धरणाचे तलांक ३०१ मी. पर्यंतचे मातीकाम व एक उद्धरण नलिकेचे जुनोने धरणापर्यंतचे कामे करणे प्रस्तावित आहे.
@@AUTHORINFO_V1@@