मंत्रालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न; महिला पोलिसांच्या ताब्यात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Aug-2018
Total Views |



मुंबई : मंत्रालयासमोर एका महिलेने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना आज सकाळी घडली. राधाबाई साळुंखे असं या महिलेचं नाव असून मंत्रालयातील सुरक्षा विभागाने वेळीच धावपळ करत या महिलेला ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला.

 

राधाबाई साळुंखे या बीड जिल्ह्यातील रहिवासी असून, जमिनीचा निकाल विरोधात लागल्याने त्यांनी मंत्रालयासमोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. दरम्यान, याप्रकरणी मारिन ड्राईव्ह पोलिसांनी संबंधित महिलेला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

@@AUTHORINFO_V1@@