सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये दोन हजार वृक्षांची लागवड

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Aug-2018
Total Views |
 

 
 
 
पुणे : राज्य शासनाच्या वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधील टेकडीवर आज मा. कुलगुरू डॉ.नितीन करमळकर यांच्या उपस्थितीत दोन हजार वृक्षांची लागवड करण्यात आली.
 
यावेळी पुणे स्मार्ट सिटी मिशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप, विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य श्री. राजेश पांडे, पुणे शहराचे नगरसेवक आदित्य माळवे व विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई हेदेखील उपस्थित होते. या कार्यक्रमास राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास मंडळाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मा. कुलगुरू डॉ. नितीन करमळकर व डॉ. राजेंद्र जगताप यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
 
या मोहिमेंतर्गत शहरामधील इतर महाविद्यालयांमध्येही वृक्षारोपण केले जाणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे स्मार्ट सिटी मिशन आणि वृक्ष संवर्धन समिती (पुणे महानगरपालिका) यांच्यातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
@@AUTHORINFO_V1@@