रॉकेलप्रमाणेच साखरेचाही ग्राहकांना वेगवेगळा दर ठेवावा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Aug-2018
Total Views |


 

भाजपचे खासदार कपिल पाटील यांची लोकसभेत मागणी
 
 

भिवंडी : देशभरात रॉकेलच्या धर्तीवरच साखरेचाही दर वेगवेगळा ठेवावा, अशी आग्रही मागणी भाजपचे खासदार कपिल पाटील यांनी लोकसभेत आज केली. शून्य प्रहरात साखरेच्या मुद्द्याकडे खासदार पाटील यांनी सरकारचे लक्ष वेधून लवकर निर्णय घेण्याचा आग्रह धरला. साखरेचे दोन वेगवेगळे दर ठेवल्यास ग्राहकांचा फायदा होण्याची अपेक्षा आहे.

 

देशभरात घरगुती वापराच्या व व्यावसायिक वापराच्या रॉकेलसाठी वेगवेगळे दर निश्चित केले आहेत. त्याच धर्तीवर घरगुती वापराच्या साखरेचेही दोन स्वतंत्र दर ठेवण्याची आवश्यकता आहे. या संदर्भात महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारला अहवाल पाठविलेला आहे. त्यावर केंद्र सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी खासदार कपिल पाटील यांनी केली.

 

देशात तयार होणाऱ्या साखरेपैकी सुमारे ६५ ते ७० टक्के साखरेचा व्यावसायिक कारणांसाठी वापर केला जातो. तर सुमारे ३० टक्के साखर घरांमध्ये वापरली जाते. साखरेचे दोन वेगवेगळे भाव ठेवल्यास ग्राहकांना आणखी स्वस्तात साखर उपलब्ध होईल. त्याचबरोबर शेतकऱ्यांनाही जादा भाव मिळू शकेल, याकडे खासदार पाटील यांनी सरकारचे लक्ष वेधले.

@@AUTHORINFO_V1@@