संसदेतील गदारोळामुळे सरकारचे नव्हे देशाचे नुकसान : पंतप्रधान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Aug-2018
Total Views |


 
 
नवी दिल्ली : संसदेचे सदस्य हे जनतेचे प्रतिनिधी असतात. ते जनसामान्यांच्या सुख-दुःखाशी जोडलेले असतात. त्यांनी त्यांच्या जनतेला काही स्वप्ने दाखवलेली असतात, काही आश्वासने दिलेली असतात. त्यामुळे जेव्हा संसदेत गदारोळ होतो व एखाद्या खासदाराला आपले म्हणणे मांडता येत नाही तेव्हा सरकारचे फार थोडे नुकसान हाते मात्र सर्वाधिक नुकसान देशाचे होते असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. २०१३ पासून २०१७ पर्यंतच्या प्रतिवर्षी १ याप्रमाणे ५ सर्वोत्तम संसदपटूंचा सत्कार आज संसद भवनाच्या केंद्रीय कक्षात राष्ट्रपती रामनाथ कोविंद याच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी त्यावेळी दोन्ही सभागृहातील सदस्यांना संबोधित करताना पंतप्रधान बोलत होते. यावेळी उपराष्ट्रपती एम्. व्यंकय्या नायडू, लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन व दोन्ही सभागृहांचे सदस्य उपस्थित होते.
 
 
 
सर्वच खासदार स्थानिक पातळीपासून काम करत करत येथपर्यंत आलेले असतात. त्यांना आपल्या मतदारसंघाचे प्रश्न मांडायचे असतात. सरकारला विविध विषयांवर काम करायला भाग पाडायचे असते असे ते म्हणाले. प्रत्येक खासदार नेहमी योग्य तेच व महत्त्वाचेच म्हणणे मांडत असतो हा माझा अनुभव आहे असे सांगतानाच मोदी पुढे म्हणाले की, काही प्रसंगी राजकारणाचा भाग म्हणून किंवा माध्यमांच्या दबावामुळे सर्वांनी ते मान्य केले नाही तरी देखील त्याचे म्हणणे हे धोरणकर्त्यांना कायमच विचार करायला लावणारे असते. मात्र ज्यावेळी संसदेत असा गदारोळ होतो त्यावेळी अशा खासदारांचा आवाज दाबला जातो. माध्यमांमध्ये त्याची थोडा वेळ चर्चा होते. मात्र ते ज्यांचे प्रतिनिधित्व करत असतात त्या गोरगरीब जनतेचे मात्र नुकसान होते. संसदेत असा गदारोळ झाला की सरकारचे फार थोडे नुकसान होते मात्र देशाचेच अधिक नुकसान होते असे मोदी यावेळी म्हणाले.
 
 
यावेळी उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार ५ खासदारांना देण्यात आला. राज्यसभेच्या माजी सदस्या डॉ. नजमा हेप्तुल्ला यांना २०१३ साठीचा, भाजपचे लोकसभेतील खासदार हुकुमदेव नारायण यादव यांना २०१४ साठीचा, राज्यसभेतील विरोधीपक्ष नेते गुलाम नबी आझाद यांना २०१५ साठीचा, तृणमूल काँग्रेसचे दिनेश त्रिवेदी यांना २०१६ साठीचा तर बिजू जनता दलाचे भर्तृहरी महाताब यांना २०१७ साठीचा उत्कृष्ट संसदपटूचा पुरस्कार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
 
@@AUTHORINFO_V1@@