अमेरिकेकडून भारताला एसटीए-१ चा दर्जा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Aug-2018
Total Views |


वॉशिंग्टन डी.सी. :
जगभरात व्यापार युद्धाचा भडका उडत असतानाच अमेरिकेने व्यापारासंबंधांमध्ये भारताला विशेष दर्जा दिला आहे. अमेरिकेने आपल्या स्ट्रॅटेजिक ट्रेड अॅथोरायजेशन (एसटीए) यादीमध्ये भारताला पहिले स्थान देण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेचे वाणिज्य सचिव विल्बर रोस यांनी याविषयी घोषणा केली असून यामुळे आता भारताला संरक्षण विषयक महत्त्वाच्या वस्तूंची आयात-निर्यात करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सूट प्राप्त होणार आहे.

दरम्यान अमेरिकेच्या या निर्णयाचे भारताकडून स्वागत करण्यात आले असून अमेरिकेचा हा निर्णय म्हणजे भारताच्या पारदर्शक आणि उत्तम व्यवहाराला दिलेली पोहोच पावती असल्याचे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. तसेच यामुळे भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध आणखी दृढ होणार असून संरक्षण आणि इतर क्षेत्रातील व्यापारामध्ये भारताला आता सुट मिळणार आहे, जी भारतासाठी अत्यंत महत्त्वाची आहे, परराष्ट्र मंत्रालयाने आज म्हटले आहे. विशेष म्हणजे आशिया खंडामध्ये अमेरिकेकडून हा दर्जा मिळालेला भारत हा एकमेव देश आहे. त्यामुळे भारतासाठी सध्या ही अत्यंत महत्त्वाची बाब मानली जात आहे.

सुरक्षा यंत्रणेसाठी लागणाऱ्या हायटेक वस्तूंच्या खरेदी विक्रीवर तसेच व्यापारावर अमेरिकेकडून अनेक नियम-अटी लावल्या जातात, तसेच यासाठी अनेक परवाने आवश्यक असतात. परंतु एसटीए-१ चा दर्जा मिळाल्यामुळे भारताला आता या व्यवहारांसाठी लागणाऱ्या परवान्यांमध्ये अधिक सुट मिळणार आहे.
@@AUTHORINFO_V1@@