कल्याण - अंबरनाथ रस्त्यालगतच्या अनधिकृत बांधकामांवर पडणार मनपा चा हातोडा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Aug-2018
Total Views |


 

उल्हासनगर : उल्हासनगर मनपाच्या हद्दीतून जाणाऱ्या कल्याण - अंबरनाथ रस्त्यालगत सध्या मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. रस्ता रुंदीकरणाच्या कामात बाधित झालेल्या काही दुकानदारांनी व अन्य काही दुकानदारांनी भूमाफियांशी संगनमत करून ही कामे उभारली आहेत. या बांधकामांवर सध्या मनपा प्रशासन कारवाई करीत नसल्याचे दिसत असले तरी या बांधकामांचा गुप्त अहवाल प्रशासनाने तयार केला असून तो शासनाकडे सादर केला जाणार आहे. व नंतर त्या बांध कामावर कारवाई होणार आहे.
 

कल्याण - अंबरनाथ रस्ता रुंदीकरणाचे काम शासनाने हाती घेतले असून आता हा कल्याण -पुणे राज्यमार्ग बनविण्यात येत आहे. उल्हासनगर मनपाच्या हद्दीत या राज्यमार्गात रुंदीकरणाच्या कारवाईत १२०० दुकाने आणि घरांवर कारवाई करण्यात आली होती. यावेळी बाधित झालेल्या लोकांना अतिरिक्त मजल्यासाठी प्रशासनाने अलिखित परवानगी दिली.या कारवाईच्या विरुद्ध काही दुकानदारांनी न्यायालयात दाद मागून स्टे ऑर्डर देखील घेतलेली आहे.यामुळे रस्ता रुंदीकरणाचे काम अद्यापही रखडले आहे. दुसरीकडे रस्त्यालगत दोन्ही बाजूला प्रचंड मोठी बांधकामे सुरू आहेत.ज्यांचा रुंदीकरणाच्या कारवाईशी काही घेणे- देणे नाही अशा दुकानदार आणि भूमाफियांनी अनधिकृत बांधकामांचा सपाटा लावला आहे . सध्या या बांधकामांवर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे या संदर्भात मनपाचे मुख्यालय उपायुक्त संतोष देहरकर यांना विचारले असता ते म्हणाले की प्रत्येक अनधिकृत बांधकामांचा आम्ही गुप्त अहवाल बनविलेला आहे. ही अनधिकृत बांधकामे कायद्याच्या कोणत्याही चौकटीत बसत नसून जास्तीत- जास्त मुंबईच्या कुरार पॅटर्न प्रमाणे या बांधकामांना परवानगी दिली जाऊ शकते त्या व्यतिरिक्त असलेल्या कामांवर कारवाई होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले . कुरार पॅटर्न मध्ये ज्या बांधकामांवर कारवाई झालेली आहे त्या बांधकामधरकांना जेवढे बांधकाम बाधित झालेले आहे तेवढ्याच बांधकामाची वरच्या मजल्याची परवानगी देण्यात येते हीच पद्धत उल्हासनगरसाठी देखील लागू होईल असेही देहरकर यांनी सांगितले .

@@AUTHORINFO_V1@@