जि.प. अध्यक्ष यांच्या हस्ते स्वच्छ सर्वेक्षण मोहीमेचा झाला शुभारंभ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Aug-2018
Total Views |


 

स्वच्छ सर्वेक्षण मोहीमेत जनतेने सहभाग व्हाजि.. अध्यक्ष मंजुषा जाधव यांचे आवाहन

 

ठाणे : ठाणे जिल्हा परिषद स्वच्छता पाणी पुरवढा विभागाच्या माध्यातूनस्वच्छ सर्वेक्षण मोहीमराबवण्यात येणार असूनसंकल्प स्वच्छतेचा स्वच्छ महाराष्ट्राचाअसं म्हणत जिल्ह्याच्या ग्रामीण भागात स्वच्छतेचा संदेश देत महिनाभर चित्ररथ फिरणार आहे. शहापूर येथे आज मंगळवार एक ऑगस्ट रोजी ठाणे जि.. च्या अध्यक्ष मंजुषा जाधव यांनी या चित्ररथाला हिरवा झेंडा दाखवून मोहिमेचा शुभारंभ केला.
 

ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट कालावधीत ही मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेत जनतेने सहभाग घेवून सहकार्य करावे असे आवाहन जाधव यांनी केले आहे. यावेळी शहापुर सभापती शोभा मेंगाळ , पंचायत समिती सदस्य श्री भला , शहापुर गटविकास अधिकारी राघवेंद्र घोरपडे, सहाय्यक गटविकास अधिकारी , सुशांत पाटील . जिल्हा कार्यक्रम व्यस्थापक अनिल निचिते, दत्तात्रय सोलंके , सारीका देशमुख आदि मान्यवर उपस्थित होते.

 

स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण मोहिमेचा संदेश देत पुढील महिनाभर स्वच्छतेची जाणीव जागृती मोहीमेच्या प्रचार प्रसिद्धी करीता एल..डी.चित्ररथ गावोगावी फिरणार आहे. या मोहिमे अंतर्गत ग्रामपंचायत, शाळा, अंगणवाडी, प्राथमिक,आरोग्य केंद्र, प्रार्थना स्थळे, यात्रास्थळे, बाजारतळ अशा विविध सार्वजनिक ठिकाणांची तपासणी करण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांनी या उपक्रमाला शुभेच्छा देताना सांगितले.

@@AUTHORINFO_V1@@