नाम घेता कृतार्थ बहु झाले ॥

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Aug-2018
Total Views |




सामान्य माणसाला विषयांची भूक लागते. प. पू. विष्णूदास महाराजांना नामाची भूक लागलेली आहे. नाम मुखात येऊन ते जीवनात उतरावं, ही इच्छा अनिवार होऊन ते अस्वस्थ होऊन जातात. इथेच सामान्य माणसापेक्षा त्यांचे वेगळेपण आणि वैशिष्ट्य दिसून येते.

 

परमात्मा परमेश्वराला प्राप्त करण्यासाठी नामसाधना करणारे संत! अनुभव व अनुभूती प्राप्त करून अखंड नामामध्ये दंग राहणारे संत! नामामधून स्वानंदाच्या सागरात स्नान करणारे संत! नामाच्या नादमयतेमुळे अंर्तबाह्य परब्रह्माचं सान्निध्य, संगत, सहवास लाभणारे संत! नामरुपी दिवा दाखवून सामान्य लोकांना परमार्थाचा मार्ग दर्शविणारे संत! भूलोकीचे चालते-बोलते ईश्‍वर असणारे संत! भारतभूमी संतांच्या वास्तव्यानं भारावलेली! समस्त भारताला प्रकाशाकडे घेऊन जाणारे संत! अशा संत परंपरेमधील थोर, श्रेष्ठ संत प. पू. श्री. विष्णुदास महाराज! ईश्वराच्या प्राप्तीसाठी घरादाराचा त्याग करणारे. भारतभ्रमण करणारे प. पू. श्री. विष्णुदास महाराज! जप, तप, अनुष्ठानात रमणारे. प्रारंभापासून प्रवृत्तीकडे पाठ फिरवून निवृत्तीकडे ओढ असणारे, दत्तसंप्रदायामधील दत्तशक्तीचा वारसा लाभलेले! श्री. गुरूचरित्रग्रंथ आणि उपासना यांचा प्रसार करणारे! साधनेमधून अभंग, ओव्या, गीतांचे स्फुरण होऊन अनेक अलौकिक काव्यरचना करणारे प. पू. श्री. विष्णुदास महाराज! स्फुरणातून साकारलेल्या रचना म्हणजे एक तेजोमयता! नामस्मरणाच्या संदर्भातील एक तेजस्वी रचना प. पू. विष्णुदास महाराजांची आहे. त्यामध्ये ते सांगतात-

नामाचे आम्ही भुकेले

नाम घेता कृतार्थ बहु झाले॥धृ॥

पाप्याचे पाप लया जाते।

पुण्याचे पुण्य वाढते।

असे दृश्य जगी बहु दिसले 1

नामाची तळमळ, ओढ लागलेली जाणवते. नाम नाहीतर जीवन निरर्थक वाटते. जसजशी नामाची भूक भागते तसतसा तृप्तीचा अनुभव येतो. हीच श्‍वासागणिक नाम आतपर्यंत मुरल्याची सुरेख खूण आहे. त्यामुळे अंर्तबाह्य नामाचा सुगंध दरवळू लागतो. भगवंताच्या अस्तित्वानं नाम अधिकच खोलवर जाते. नामातला भगवंत सगुणात साकार होतो. नामसाधनेतून साकार झालेला भगवंत जन्माच्या कृतार्थतेची अनुभूती देतो. ही कृतार्थता संपूर्ण जीवनाला व्यापून उरते. पुढे प. पू. विष्णुदास महाराज हे नामस्मरणामुळे कितीही पापी असणार्‍या माणसाची पापे नाहीशी होतात, ती लय पावतात असे विशद करतात.पापांचा क्षय आणि लय होणे ही सोपी गोष्ट नाही.इतर साधना करून पापे नष्ट होतीलच असे नाही. परंतु, नामसाधनेमुळे ते घडून येते. स्थळ, काळ, वेळेचे बंधन नसलेल्या नामसाधनेचे फलित म्हणजे पापांचे पर्वत नष्ट होणे. आधी पापांचा लय नंतर पुण्याचा संचय होतो. पुण्यवान माणसाच्या पुण्यामध्ये वेगाने वाढ होते. नामस्मरणाचा प्रभाव कथन करताना ते सांगतात की, पुण्याचा संचय वृद्धिंगत होतो.संपूर्ण जगामध्ये दृष्टोत्पत्तीस आलेला अनुभव म्हणजे पापी माणसांची पापे निघून जाऊन पुण्याची भरपूर प्राप्ती होणे हा होय.

पुढील ओळी म्हणजे-

पाप- पुण्याचा विचार सोडा

नामाने नामि तो ओढा।

संतानी हेची सांगितले

नाम घेता कृतार्थ बहु झाले 2

माणसाच्या उन्नतीचे टप्पे . पू. श्री. विष्णुदास महाराजांनी कथन केलेले आहेत.पापे नष्ट करून पुण्याचा संचय करणे हे दोन टप्पे झाले. आता त्यापुढील उन्नतीचा टप्पा म्हणजे पाप-पुण्याच्या विचारांच्या पलीकडे जाणे. नामस्मरणाने नामिला पुढे पुढे नेणे. नाम आणि नाभी यांचा घनिष्ठ संबंध सांगितलेला आहे. नाम घेता घेता अक्षरश: अवस्था प्राप्त होते की नाम आणि नामस्मरण करणारा यांच्याही पलीकडे पोहोचतो. हा उन्नतीचा पुढचा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. सकल संतांनी नाममाहात्म्य आणि त्यामधून साधलेली प्रगती सांगितलेली आहे. आत्मज्ञानी असणार्या . पू. श्री. विष्णूदास महाराजांनी सकल संतांचा उपदेश वरील ओळीत कथन केला. यामधून त्यांची विनम्रता लक्षात येते.

. पू. विष्णूदास महाराज हे भगवान दत्तात्रेयांचे सदैव नामस्मरण करत. दत्तप्रभूंच्या नामामधील शक्तीचा प्रत्यय येऊन त्यांनी कृतार्थतेचा अनुभव घेतला. दत्तप्रभू हेच दैवत मानणार्या विष्णुदास महाराजांना आलेली अनुभूती त्यांनी रचनेमधून व्यक्त केलेली आहे. सकल सिद्धी प्राप्त झालेल्या . पू. महारांजांनी साध्या-सोप्या भाषेमध्ये सामान्य लोकांना नाममाहात्म्य कथन केले. पुढील ओळी खालीलप्रमाणे आहेत.

होवो निंदा-स्तुती ती जगती

देऊ नये त्यासी संगती॥

विष्णुदासा हेचि ते कळले।

नाम घेता कृतार्थ बहु झाले 3

साधना करणार्यांनी निंदकाच्या निंदेकडे लक्ष देऊ नये. सकल संतांना विरोध, निंदेला तोंड द्यावे लागले. . पू. विष्णुदास महाराजांनादेखील याच त्रासाला सामोरे जावे लागले म्हणून ते सांगतात, निंदेची संगत धरु नये. त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करावे.उपासना, नामसाधना करणार्यांचे काही लोक कौतुकही करतात. त्यांच्यावर स्तुतीसुमनांचा वर्षाव करतात तेव्हा जास्त धोका असतो. निंदा स्तुतीकडे लक्ष देता आपली नामसाधना अखंड चालू ठेवावी. निंदेने खचून जाणे आणि स्तुतीने हुरळून जाणे अशा गोष्टी घडल्या, तर प्रगती होता अधोगतीचा मोठा धोका संभवतो. यावर एकमेव उपाय म्हणजे निंदा आणि स्तुती यांना दूर ठेवणे. . पू. विष्णूदास महाराजांनी याप्रमाणे साधना केली. ही पथ्ये पाळली त्यामुळे त्यांना भगवंताच्या प्राप्तीचं ध्येय गाठता आले.

. पू. विष्णूदास महाराजांनी अल्प शब्दात मोठा आशय व्यक्त केलेला आहे. ते अधिकारी संत होते. त्यांना समाजाच्या उद्धाराची, कल्याणाची तळमळ होती म्हणून त्यांनी उपासनेतीलनामसाधनाकरण्याचा उपदेश केला. नामामुळे कृतार्थता प्राप्त झाल्याचं कथन करून नामसाधनेचे महत्त्व अधोरेखित केलेले आहे. त्यांचे अध्यात्मातील गहन, गूढ अर्थाची उकल सोप्या शब्दात करण्याचे कौशल्य वाखाण्याजोगे आहे.त्यांनी संपूर्ण जीवन भगवान दत्तात्रेयांच्या भक्तीमध्ये व्यतीत केले. स्वत: समवेत शेकडो लोकांना उपासनेच्या प्रशस्त, प्रकाशमय मार्गावर बोट धरून घेऊन गेले. संसारातील संकटांतून बाहेर काढून अध्यात्म, परमार्थ उपासना, नामसाधना याकडे घेऊन जाणारे . पू. विष्णुदास महाराज! त्यांची भगवंताच्या नामसंदर्भात आणखी

एक रचना आहे.

देवा तुझे नाम किती गोड गोड।

पुरवीशी कोड सर्व माझे॥

यामध्ये देवाचे नाम अत्यंत गोड असल्याचे ते सांगतात. तुझे गोड नाम घेतल्यामुळे जीवनात नामामृताची गोडी चाखायला मिळाली असे ते देवाच्या नामाचा महिमा कथन करतात. हा देव माझे लाड करतो. माझा सांभाळ मातेप्रमाणे करतो. नामाचा महिमा, महात्म्य कथन करणार्या त्यांच्या रचना उत्तम उत्कृष्ट उदात्त भावाने ओतप्रोत भरलेल्या आहेत, त्यामध्ये भक्तीचे गहिरे रंग भरलेले आहेत. ते रंग कधीही पुसले जाण्याची सुतराम शक्यता नाही त्यांच्या प्रत्येक शब्दमधून भगवंताचा प्रेमभाव व्यक् होतो, हे व्यक्तिकरण असामान्य आहे. सामान्य माणसाच्या शब्दामध्ये कल्पनेची भरारी असते, तर . पू. विष्णूदास महारांच्या शब्दामध्ये अनुभूतीची खोली असते. पैसा प्रसिध्दी यापासून खूप दूर असणारी रचना हृदयात जाऊन ठसते. त्यापासून प्रेरणा प्राप् होऊन समाज नामसाधना करण्यास प्रवृत्त होतो, त्याला नामाची गोडी लागून भगवंताशी जोडला जातो. सकारात्मकतेमधून सुयोग्य दिशा लाभते. त्यामुळे निराशा, नैराश्य यांची काळजी समाजमनावर चढत नाही. . पू. विष्णूदास महाराजांच्या शब्दांमधील शक्ती समाज परिर्वतन घडवून आणणारी आहे.

 

शेकडो वर्षांचा काळ लोटला, तरी . पू. महाराजांच्या रचनेचा प्रभाव कमी होणार नाही. नामसाधनेमधून भगवंताची प्राप्ती होते. हे सत्य अबाधित राहणारे आहे. सत्याला अजरामरतेचे वरदान लाभलेले आहे. त्यामुळे ही रचनाअक्षय’ राहणारी आहे. त्याला क्षयाचा कणभरही धोका नाही. याची अवीट गोडी भक्तांच्या अंर्तमनात कायम राहील. श्रेष्ठ संत असलेल्या . पू. विष्णूदास महाराजांची रचना श्रेष्ठतम् आहे. त्याला सुवर्णसमान झळाळी प्राप् झालेली आहे. ही रचना सात्त्विक सुंदरतेचा साज ल्यायलेली आहे. यामधून समाधान, शांती, प्रसन्नतेचा आणि आनंदाचा अक्षयस्वरूपी लाभ उपासकांना भक्तांना होईल, यात शंका नाही.

 

-कौमुदी गोडबोले

@@AUTHORINFO_V1@@